याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे शेतकरी सत्यवान मिसाळ यांच्या शेतात एक अज्ञात उपकरण आकाशातून कोसळल्याने गावात मोठी खळबळ उडाली. विचित्र आकाराचे उपकरण, त्याला जोडलेली पांढरी रबरासारखी पिशवी व लांबलचक दोरी आणि संभ्रम निर्माण झाला. ग्रामस्थांनी ही माहिती प्रशासनाला दिली असता, तपास केल्यानंतर हे निरीक्षणासाठी वापरण्यात येत असलेले उपकरण असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
मुलाच्या लग्नाची बोलणी ठरली अखेरची घटका, पती-पत्नीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, जालन्यातील घटना
घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांना हे कोणते संशयास्पद किंवा धोकादायक साहित्य तर नाही ना, असा प्रश्न पडला. काहींना ते ड्रोनचे अवशेष, तर काहींना स्फोटक यंत्रासारखे वाटल्याने गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे हे यंत्र मोठ्या बलूनसोबत आकाशात सोडले जाते. बलून वातावरणाच्या उंच थरांमध्ये फुटल्यावर हे हलके उपकरण वाऱ्याच्या दिशेने शेतात येऊन पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांचा संभ्रम दूर झाला.






