जालना : महिला भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला महालक्ष्मी हा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे महालक्ष्मीसाठी लागणारे मुखवटे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात महिलांची एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जालना शहरांमध्येही हिंगोली इथून आलेले कारागीर महालक्ष्मीच्या कोठ्या बनवण्याचे काम करतात. मागील 50 वर्षांपासून दरवर्षी ते जालना शहरात येतात आणि कोठ्या बनवून त्याची शहरात विक्री करतात. यातून त्यांच्या उपजीविका भागवली जाते. यावर्षीही या कारागिरांचं कोठ्या तयार करण्याचं काम कसे सुरू आहे आणि यातून त्यांना किती कमाई होते, याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
जालना शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावर धोत्रे कुटुंबातील 7 ते 8 कुटुंबे जालना शहरात कोठ्या बनवण्यासाठी स्थायिक झाले आहेत. तब्बल महिनाभर ते जालना शहरात राहून कोठ्या तयार करण्याचे काम करतात. यानंतर महालक्ष्मी सण जवळ आल्यानंतर या कोठ्यांची विक्री केली जाते. 1700 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत या कोठ्यांचा दर असतो. कोठ्यांचा एक जोड तयार करण्यासाठी एका कारागिराला संपूर्ण दिवस लागतो. यातून 300 ते 400 रुपयांची निव्वळ कमाई होते, असे विनोद धोत्रे यांनी सांगितले.
महालक्ष्मी हा सण जवळ आल्याने आम्ही जालना येथे आलो आहोत. मात्र, रस्त्यावर दुकान लावल्यानंतर महापालिका पाठीमागे लागली आहे. तर रेल्वे प्रशासनही आम्हाला हाकलवून लावत आहे. त्यामुळे खूप विनंती केल्यानंतर आम्हाला इथे काम करायला मिळाले आहे. महिनाभर कोठ्या तयार करून त्याची विक्री केल्यानंतर आमचा उपजीविकेचा प्रश्न सुटतो.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालंय?, मग 72 तासांच्या आतच विमा कंपनीकडे करा तक्रार, VIDEO
दररोज 3 ते 4 जोड कोठ्यांची विक्री होते. यातून 1200 ते 1500 रुपयांची कमाई होते. एरवी आम्ही डबे, चाळण्या इत्यादी वस्तू बनवून त्याची गाव-खेड्यामध्ये विक्री करण्याचा व्यवसाय करतो. हेच आमच्या कमाईचे साधन असल्याने प्रशासनाने ही आम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा तारा धोत्रे यांनी व्यक्त केली.
पोटाच्या आजारांपासून ते केसगळतीपर्यंत, मोसंबी आरोग्याला खूपच फायदेशीर, महत्त्वाची माहिती
या ठिकाणी तीन फूट, सव्वा तीन फूट आणि साडेतीन फूट अशा तीन प्रकारांमध्ये कोठ्यांची जोडी उपलब्ध आहे. तीन फूटाची जोडी ही 1750 रुपये, सव्वातीन फुटाची जोडी ही 1950 रुपये, साडेतीन फुटाची जोडी ही 2150 रुपयांना विक्री केली जाते. तसेच लहान-पिलोंडे 500 रुपयांना विकले जात आहेत.