अवघडराव सावंगी येथील विठ्ठल कुंडलिक गावंडे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची लग्ने झाली असून, त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. विठ्ठल गावंडे यांच्याकडे एकूण अडीच एकर शेतजमीन होती. यापैकी दीड एकर जमीन त्यांनी यापूर्वीच मुलगा आरोपी सागर गावंडे याच्या नावावर तर राहते घर सुनेच्या नावावर केले आहे.
सावधान! ई-बाईक ठरतेय जीवघेणा बॉम्ब, छ. संभाजीनगरच्या महिलेचा मृत्यू, पाहा काय घडलं?
advertisement
विठ्ठल गावंडे यांच्या नावावर शिल्लक असलेली एक एकर शेतजमीन तातडीने आपल्या नावावर करून द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. वडिलांनी शेती नावावर करण्यास नकार देताच, संतप्त झालेल्या मुलगा व सुनेने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना घरातून हाकलून दिले, असा आरोप विठ्ठल गावंडे यांनी केला आहे.
या घटनेनंतर गेल्या दोन महिन्यांपासून हे वृद्ध वडील बाहेरच आपला उदरनिर्वाह करत आहेत. अखेरीस त्यांनी पोलिसांत धाव घेतली. विठ्ठल गावंडे यांच्या तक्रारीवरून पारध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






