जालना शहरामधून भगवान बाबा आनंदगडकर यांच्या नेतृत्वात दोन ते अडीच हजार कारसेवक अयोध्या येथे दाखल झाले होते. बाबरी मशिदीचा विध्वंस करत असताना रामललाची बालपणीची लहानशी मूर्ती ज्या खोलीत ठेवण्यात आली होती त्या खोलीची निगराणी स्वतः भगवान बाबा आनंदगडकर हे करत होते.
पाटलांच्या घरात होतेय बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा, तिसरी पिढी जपतेय परंपरा, कारण आहे खास Video
advertisement
6 डिसेंबर रोजीचा तो दिवस मोठा कठीण होता. कारण परिस्थिती बिघडली असती तर आमचा तिथेच मृत्यू देखील होऊ शकला असता. परंतु राज्यात कल्याण सिंग तर केंद्रात नरसिंहरावांचे सरकार होतं. सुदैवानं अशी काही दुर्घटना घडली नाही. हे सर्व कार्य जरी आम्ही केलं असं वरवर वाटत असलं तरी कर्ता करविता हा प्रभू श्रीराम हेच होते. एक ना एक दिवस धर्मानुकूल सरकार येईल आणि भव्य श्रीराम मंदिर उभे राहील ही इच्छा आमच्या मनात जरूर होती. परंतु तो दिवस एवढ्या लवकर पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं, असं भगवान बाबा आनंदगडकर यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.





