तेव्हा आमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवू : जरांगे पाटील
मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईत सरकारसोबत चर्चेसाठी कधी पाठवायचं हे उद्या सरकारकडून निरोप आल्यानंतर कळवलं जाईल, असं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आमच्या शिष्टमंडळात 16 ते 17 जण असतील. आम्ही आमच्यात बैठक करू. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण अभ्यासक, आंदोलक, ओबीसी आरक्षण अभ्यासक असे तज्ञ असतील. उद्या मुख्यमंत्री बाहेर जाणार आहेत. त्यांचा एक दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सरकारचा निरोप आल्यानंतरच शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईत पाठवलं जाईल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
उपोषण लांबवायला नको हे सरकारला समजायला हवं. पण मुंबईत सरकारकडे चर्चेसाठी शिष्टमंडळात जाणारे सर्व लोक माझ्या तालमीत तयार झालेले असून आरक्षणाचा किल्ला ते जिंकूनच येतील अन्यथा उपोषण सुरूच राहील असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
वाचा - मराठवाड्यात मराठ्यांना आरक्षण मिळणार? 1 लाख प्राध्यापक लागले कामाला
उपोषण मागे घेण्यासाठी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना पत्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी 6 सप्टेंबर) निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा - कुणबी, कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आले.