मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटलं की, रात्री बंदुकीचा फोटो टाकला. दम होता तर थांबायचं. आम्हाला येऊ द्यायचं नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही. थोडं पुढं गेल्यावर होणार होता म्हणून सकाळी निघणं गरजेचं होतं. कोणाकडे काहीच साहित्य नव्हतं. फडणवीसमध्ये दम नाही, पोलिसांच्या आडून सगळं करतायत असंही जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
Maratha Reservation : जरांगे आमरण उपोषणाचा निर्णय घेणार? सरकारसमोर 3 मागण्या
मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही शांत रहा. त्याच्या किती दम होता हे मला माहितीय. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावीच लागेल. फडणवीसांबद्दल नाराजीची लाट उसळेल. तुमच्याशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा आदेश काढू शकत नाहीत. आता विचार करूनच पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. रात्रीचा त्याचा डाव मोडला. सगळ्यांना एका विचाराने पुढं जायचं आहे. महिलांवर हात उचलायला लावणार होता. राज्यकर्त्यांना हे शोभत नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केले.
दम असेल तर सागर बंगल्यावर ये. तुला जातीवर आव्हान केलं होतं. तू बामणाचा असला तर मी खानदानी मराठा आहे. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. सत्ता कशी येते बघतो. जनता काम केल्यावर आदर करते. फडणवीसांनी लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. मराठ्यांनी शांत रहावं असं आवाहन पुन्हा जरांगे पाटलांनी केलं.
