Maratha Reservation : जरांगे आमरण उपोषणाचा निर्णय घेणार? सरकारसमोर 3 मागण्या
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अंबड तालुक्यात संचार बंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे एसटी बस पेटवल्याची घटना घडलीय. यावर जरांगे पाटील यांनी जाळपोळीचे समर्थन नाही असं म्हटलंय.
सिद्धार्थ गोदाम, जालना : जालना जिल्हाधिकारी यांनी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली. त्यामुळे अंतरवाली सारती मध्ये आंदोलस्थळी शुकशुकाट आहे. जरांगे पाटील यांनी स्वतःच आलेल्या मराठा बांधवांना अंतरवाली सराटी मध्ये कुणीही येऊ नये असं आवाहन केलं आहे. अंतरवालीत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, रात्री पोलिसांचा वेगळा प्रकार करण्याचा डाव होता. उपोषणाचा अधिकार कुणी हिरावू शकत नाही. शेवटी त्यांनी हार मानली आणि संचारबंदी लावली.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपचार घेण्याची तयारी दर्शवलीय. सरकारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी सलाईनसुद्धा घेतले. जरांगे पाटील म्हणाले की, कोर्टाचा मान ठेवून मी सलाईन लावलंय. आता सगे सोयऱ्यांचा निर्णय घ्या. अधिवेशन सुरू झालं आहे. गॅझेट अंमलात आणा. तसंच आमरण उपोषणाबाबतचा निर्णय आज पाच वाजता घेणार आहे.
अंबड तालुक्यात संचार बंदी लागू केली आहे. तर दुसरीकडे एसटी बस पेटवल्याची घटना घडलीय. यावरून बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात शांततेत रास्ता रोको झाला. जाळपोळ उद्रेकाच्या घटनांचे समर्थन नाही. आज इंटरनेट बंद ठेवलं आहे. पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. आमचा हक्क नाही का मुंबईला मागणीसाठी जाण्याचा? सगे सोयरे लागू करा, नाराजी लगेच मागे घेतो असंही जरांगेंनी म्हटलं.
advertisement
एक एक मावळा महत्वाचा आहे. हेच मावळे पुढे कामी येईल आणि आम्ही किल्ला जिंकूच. आम्ही कुठे म्हणालो मुख्यमंत्री यांनी इगो ठेवला. आम्ही नेहमी शिंदेच आम्हाला आरक्षण देणार म्हणत होतो. फडणवीस बाबतही मी कधी बोललो नव्हतो. तुम्ही डाव बंद करा. पुन्हा अंतरवाली करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत जरांगे पाटलांनी इशारा दिला.
advertisement
तुमच्या हातात सगळे असून हवा तो तपास करा. मला आधी म्हणाले शरद पवारचा आहे. नंतर म्हणाले उद्धव ठाकरे, त्यानंतर राज ठाकरे यांचा आहे. पण काहीच निघत नाही यातून, हे फक्त आरोप आहेत. सरकारला शब्द बदलू शकत नाही. तर मराठे उलटतील. आजही दोघांना संधी आहे असंही जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारकडे तीन मागण्यासुद्धा केल्या आहेत. आमचे आम्हाला आरक्षण द्या, आमची नाराजी जाईल. आंदोलकांवर करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. गॅझेट घ्या. सगेसोयरे लागू करा अशा तीन मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण झाल्यास आमची नाराजी जाईल असं जरांगे पाटील म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2024 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maratha Reservation : जरांगे आमरण उपोषणाचा निर्णय घेणार? सरकारसमोर 3 मागण्या


