TRENDING:

Maratha Reservation : अयोध्येला जाणार का? मनोज जरांगे पाटील यांनी एका वाक्यात दिलं उत्तर

Last Updated:

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राम मंदिर उद्घाटनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी राम मंदिर उद्घाटनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला नक्की जाऊ. आम्ही रस्त्यानं चालताना 22 तारखेला राम मंदिराचा आनंद साजरा करू, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते अंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
advertisement

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

शंभुराजे देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणांबाबतच्या बैठकांना बोलावलं. पण मी या बैठकांना जाणार नाही. उद्या 4 ते 5 मॅरेथॉन बैठका मुंबईत होणार असून ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे केली आहे. सरकारनं उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा अणि आम्हाला काय निर्णय घेतला याबाबत कळवावे असही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

advertisement

20 तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेची दारं खुले असून अंतरवालीतून आम्ही पाय बाहेर टाकला की सरकारसाठी चर्चेची दारं बंद होतील नंतर चर्चा नाही असंही ते म्हणाले. आंदोलनात हसू होईल असं कृत्य एकाही मराठ्याने आंदोलनात करू नये, फक्त शांत होऊन आंदोलनात बसा असंही ते म्हणाले. आम्हाला आवडलं तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई आणि मतदार संघातील दारात जाऊन बसणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

advertisement

वाचा - पुण्याच्या निधी वाटपाचा वाद; भाजपच्या नाराजीनंतर अजितदादांचं विखेंकडे बोट

आता मराठा हे कुणबी असल्याचे ट्रकभर पुरावे सापडलेत. मग आरक्षणात देण्यात अडचण काय आहे? मराठ्यांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 13 तारखेला ओबीसींची बीडमध्ये सभा होणार आहे. यावर बोलताना तो तुमचा राजकारणासाठी वापर करतोय. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्या आहेत. आम्हाला तिथेच आरक्षण हवंय, त्याचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका, तो इकडे सभेत लोक दाखवतो आणि त्याच्यावरील केसेस मागे घेतो अशी टीकाही जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केली. आभाळ आलं की तो फिरतो. त्याला निबार गोळी द्या असा टोला जरांगे पाटील यांनी सरकार आणि भुजबळ यांना मारला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Maratha Reservation : अयोध्येला जाणार का? मनोज जरांगे पाटील यांनी एका वाक्यात दिलं उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल