TRENDING:

ही फुले अतिशय दुर्मिळ, पण चटणी लागते एकदम भारी!, अशी आहे झेटुनीच्या फुलांची रेसिपी

Last Updated:

काही प्रकारच्या रानभाज्यांची शहरांमध्येही विक्री होते. मात्र, काही अतिशय दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या या केवळ तेथील प्रादेशिक लोकांनाच खायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे काटेरी झुडपावर वाढणारी झेटूनीची फुले

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना : पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या शेतामध्ये, शेताच्या बांधावर किंवा रानमाळावर उगवतात. या रानभाज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या पोषण तत्वांनी भरपूर असतात. त्याचप्रमाणे रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर न झाल्याने विषमुक्त असतात. त्यामुळे या रानभाज्या खाण्याकडे सर्वांचाच कल असतो.

काही प्रकारच्या रानभाज्यांची शहरांमध्येही विक्री होते. मात्र, काही अतिशय दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या या केवळ तेथील प्रादेशिक लोकांनाच खायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे काटेरी झुडपावर वाढणारी झेटूनीची फुले.

advertisement

डोंगराळ माळरानावर झेटूनीच्या फुलांचा वेल असतो. हा वेल सहसा काटेरी झुडपांवर वाढलेला असतो. या वेलांवर पाऊस पडल्यानंतर साधारण महिन्याभरानंतर सुंदर अशी फुलांची गुच्छ येतात. ही फुले तोडणे हेदेखील एक जिकिरीचं काम असतं.

ही गुच्छ तोडून घरी आणल्यानंतर स्वच्छ केली जातात आणि त्यानंतर अतिशय रुचकर अशी भेटूनीची चटणी तयार केली जाते. झेटूनीची चटणी तयार करण्यासाठी कोणकोणते साहित्य आवश्यक असते आणि झेटूनीची चटणी कशा पद्धतीने तयार होते, हेच आपण आज जाणून घेऊयात.

advertisement

कोरोनाकाळात नोकरी गेली, गावी परतून सुरू केला व्यवसाय, आज महिन्याला तब्बल इतक्या रुपयांची उलाढाल

झेटूनीची चटणी तयार करण्यासाठी स्वच्छ धुतलेली झेटूनीची फुले यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा, घरामध्ये असलेला मसाला, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा चवीपुरतं मीठ, कढीपत्त्याची दोन-तीन पाने आणि आवश्यकतेनुसार तेल, इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.

advertisement

फक्त 40 सेकंदात तोंडपाठ सांगितली आफ्रिका खंडातील 53 आफ्रिकन देशांची नावे, पुण्यातील 2 वर्षांचा हा चिमुकला आहे तरी कोण?

सर्वात आधी झेटूनीच्या फुलांना स्वच्छ करून घ्यावे. यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घ्यावे. फुले धुऊन घेतल्यानंतर त्यामधील पाणी काढायचे. तोपर्यंत एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यावा. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं. बारीक चिरलेला कांदा मध्यम आचेवर त्यामध्ये टाकायचा. कांद्याला तपकिरी रंग यायला सुरुवात झाल्यानंतर कढीपत्त्याची दोन-तीन पाने टाकायची.

advertisement

यानंतर त्यामध्ये मसाला ॲड करायचा. हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर हळद मीठ घालायचे आहे. त्या सर्व मिश्रणाला खरपूस भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेली फुले टाकायची. तसेच पुढील 4 ते 5 मिनिटे या फुलांना परतवून घेतल्यानंतर अतिशय रुचकर आणि चविष्ट अशी झेटूनीच्या फुलांची चटणी तयार होते. तुमच्याकडेही या फुलांची उपलब्धता असेल तर ही रुचकर अशी रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
ही फुले अतिशय दुर्मिळ, पण चटणी लागते एकदम भारी!, अशी आहे झेटुनीच्या फुलांची रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल