जालना : जालना जिल्हा हा मोसंबी पिकाचे आगार समजला जातो. जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या जालना मोसंबी मार्केटमध्ये आंबिया बहाराची मोसंबी विक्रीसाठी येत आहे. बाजारात दररोज 200 ते 500 टन मोसंबीची आवक होत आहे. या मोसंबीला 18000 ते 22 हजार रुपये प्रति टन एवढा दर मिळत आहे.
मराठवाड्याच्या मातीत पिकलेल्या मोसंबीला विशिष्ट अशी चव असल्याने तसेच ही मोसंबी टिकाऊ असल्याने उत्तर भारतामध्ये मोसंबीला मोठी मागणी आहे. जालना मोसंबी मार्केट मधून उत्तर भारतातील कोणकोणत्या राज्यांमध्ये मोसंबी जात आहे, याचबाबत लोकल18 चा हा आढावा.
advertisement
मोसंबी खरेदी-विक्रीचे राज्यातील जालना हे सर्वात मोठे मार्केट आहे. इथे दररोज 200 ते 500 टन मोसंबीची आवक सध्या होत आहे. सुरुवातीच्या काळात मोसंबीची फळगळ होत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल बाजारात आणला जात होता. सध्या पाऊस सुरू असल्याने आवक काही प्रमाणात कमी असली तरी दररोज दीडशे ते दोनशे टन मोसंबीची आवक होत आहे.
नर्सरीचा बिझनेस, महिन्याला तब्बल 3 लाखांचा नफा, 5 वर्षातच बीडमधील व्यक्तीने व्यवसाय यशस्वी!
काय आहे दर -
जालना आणि छत्रपती संभाजीनगर बरोबरच बीड, परभणी आणि बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मोसंबी घेतली जाते या ठिकाणाहून देखील जालना मार्केटमध्ये मोसंबी विक्रीसाठी येत आहे. या मोसंबीला सुरुवातीला 12 ते 18 हजार रुपये प्रति टन एवढा दर मिळाला आहे. आता या दरामध्ये सुधारणा झाली असून 18 ते 22 हजार रुपये प्रति टन एवढ्या दराने मोसंबीची विक्री केली जाते.
Rain in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर सुरूच, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट, VIDEO
कोणत्या शहरात होतेय निर्यात -
ही मोसंबी उत्तर भारतातील दिल्ली, जयपूर, लखनऊ, कानपूर, मथुरा, वाराणसी या शहरांमध्ये पाठवली जात आहे मराठवाड्यात पिकलेली मोसंबी ही जास्त टिकाऊ असते. यामुळे उत्तर भारतातील व्यापारी महाराष्ट्रातील मोसंबीला प्राधान्य देतात. सध्या आंध्र प्रदेश राज्यातील मोसंबीची प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशची मोसंबी ही कमी टिकाऊ असल्याने आगामी काळात मोसंबीचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता मोसंबी असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी व्यक्त केली.