जालना : "चहाला वेळ नसते. मात्र, वेळेला चहा हवाच" हे चहाचं महत्त्व अधोरेखित करणारं वाक्य भारतीय जनमानसाच्या मनामनात कोरलं गेलं आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सुख दुःखाच्या प्रसंगी चहा घेतला जातो. अनेक छोट्या कुटुंबाचा आधारही हाच चहा होत आला आहे.
व्यवसाय करताना अनेक चढ-उतार -
जालन्यातील सराफा बाजारात चहा विक्री करणाऱ्या मनोज घारे यांच्या कुटुंबाचा आधारही हाच चहा आहे. मागील 40 वर्षांपासून ते चहा विक्री करून आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवतात. केवळ 75 पैशांपासून त्यांनी चहाची विक्री केली आहे. चहाचा व्यवसाय करताना अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले. जालना शहरातील सराफा बाजारात सध्या त्यांचा चहाचा स्टॉल आहे. या स्टॉलवर त्यांनी लावलेला मोदींचा फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पण नेमकं त्यांना आपल्या चहाच्या स्टॉलवर पंतप्रधानांचा फोटो लावावा, असं का वाटलं, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
आता केमिकल टाकण्याचीही गरज नाही, फक्त हे एक काम करा, घरात अनेक वर्ष खराब होणार नाही गहू
मनोज घारे हे मागील 40 वर्षांपासून चहा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. जालना शहरातील सराफा बाजारात युनियन बँकेपासून त्यांचा चहाचा स्टॉल आहे. चहाच्या व्यवसायात ते अपघातानेच आले. त्यांच्या आईच्या निधनानंतर स्वतः काहीतरी करावे म्हणून त्यांनी चहाचा स्टॉल सुरू केला. चहाची गुणवत्ता लोकांना आवडू लागली आणि हळूहळू त्यांनी व्यवसाय विस्तारत नेला.
एकीकडे त्यांच्या चहाच्या स्टॉलवर तब्बल 100 लीटर दूध विक्री व्हायचं आणि तब्बल 1000 चहाच्या ग्लासांची विक्री व्हायची. 7 कामगार त्यांच्या हाताखाली कामाला होते. मात्र, चहाचा स्टॉल हा लाकडी असल्याने अनेकदा पावसाच्या पाण्यात भिजल्याने मोडकळीला यायचा. दर चार-पाच वर्षांनी त्यांना तो गाडा बदलावा देखील लागायचा.
6 वर्षांच्या तयारीचं फळ, छ. संभाजीनगरच्या सृष्टीचा आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत डंका, VIDEO..
यानंतर पंतप्रधान मुद्रा योजनेतून त्यांना एक लाखांचं लोन मिळालं आणि त्यांनी यातून स्टीलचा टूमदार चहाचा गाडा तयार केला. यामुळेच आपण या गाड्यावरती पंतप्रधान मोदींचा फोटो लावला आहे. मोदी हे लहान व्यवसायिकांना नेहमीच प्रोत्साहन देतात तसेच आमच्यासारख्या चहावाल्यांसोबत स्वतःला जोडून घेतात. त्यामुळे ते नेहमीच आपलेसे वाटतात. म्हणूनच आम्हाला मोदींविषयी आदर असून त्यामुळे कृतज्ञता म्हणून हा फोटो लावल्याचे मनोज यांनी सांगितलं.
सध्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे चहाचा फारसा व्यवसाय होत नाहीत. तरीदेखील दोन ते तीन हजारांचा दररोजचा व्यवसाय होतो. यातून हजार पाचशे रुपये निव्वळ राहतात, असं गारे यांनी सांगितलं.