जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नाव रातोरात आलं बदलण्यात आले, राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे डिजिटल कारखान्याच्या कमानीवर आले लावण्यात आले. राजारामबापु पाटील साखर कारखाना असे नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे करण्यात आले आहे. महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे यंदा धुराडा पेटू देणार नाही, असा इशारा दिला होता. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याकडून 2012 मध्ये विजयसिंह डफळे साखर कारखाना विकत घेण्यात आला होता. हा कारखाना जयंत पाटलांकडून हडप करण्यात आलाच आरोप करत सभासदांच्या मालकीचा असणारा पूर्वीचा विजयसिंह राजे डफळे साखर कारखाना परत करावा, अशी मागणी पडळकरांकडून करण्यात आली होती.
आता थेट कारखाना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानी वरील नाव अज्ञातंकडून बदलण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जतच्या साखर कारखान्यावरून गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील सुरु असलेला संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सांगलीत मागील काही महिन्यांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्याविरोधात चांगेलच आक्रमक झाले आहेत. पडळकर यांनी जयंत पाटलांविरोधात काही वादग्रस्त वक्तव्ये केले होते. त्यावरून सांगलीतील राजकारण पेटले होते.
