जयकुमार गोरे यांची बदनामी करून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात वडूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पत्रकार तुषार खरात आणि एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रामराजेंच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत.
जयकुमार गोरे प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेचे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत फोनवर संवाद झाल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्यानंतर पोलिसांनी रामराजे निंबाळकर आणि शरद पवार गटाच्या इतर नेत्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते.
advertisement
आज सकाळी पोलिसांचे पथक रामराजे यांच्या फलटण येथील निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले. चौकशीसाठी त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्या या संवादामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांमध्ये रामराजेंचा काही हस्तक्षेप होता का, हे तपासलं जात आहे.
वडूज पोलिसांनी या प्रकरणात अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असली तरी, रामराजे यांची भूमिका निष्पक्ष होती की हेतुपुरस्सर संवाद झाला होता, याचा सखोल तपास केला जात आहे. फोन कॉलमध्ये साधारण संभाषण झाले की कोणता कट आखला गेला होता, याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रकरण नेमकं काय?
जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक आरोप करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 1 कोटी रुपयांची खंडणी घेताना संबंधित महिलेला रंगेहात अटक करण्यात आली होती. तर, त्याआधी पत्रकार तुषार खरात यांनादेखील खंडणी व इतर गुन्ह्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून खरात यांनी गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
आता, अटकेत असलेल्या महिलेचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत फोनवर संभाषण झाल्याचे समोर आले. त्याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे,