फिलिप्स इंडियाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 7.5 लाख इतक्या किंमतीची सोलर हाय- मास्ट लायटिंग सिस्टम मोफत प्रदान केली. लोकार्पणावेळी महानगर पालिका आयुक्त संजय जाधव, अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत, फिलिप्स इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख श्रीकांत फणसे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उपकार्यकारी अभियंता भागवत पाटील आणि फिलिप्स इंडियाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडला. फिलिप्स इंडियाकडून सोलर हायमास्ट सिस्टम प्रायोगिक तत्त्वावर केडीएमसीला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
advertisement
विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत यांनी प्रतिक्रिया दिली की, वीज पुरवठा खंडित किंवा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शहर अंधारात बुडून जातं. त्यावेळी रस्त्यावर चालणार्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. अंधाराचा गैरफायदा घेऊन काही गैर कृत्य झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, सोलर हायमास्टमुळे या गैरकृत्यांना आळा बसणार आहे. शिवाय, शहर अंधारमय होणार नाही.
नेहमीच्या सोलर हायमास्टपेक्षा या दिव्यांचा प्रकाश देखील अधिक जास्त आहे. शिवाय, बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस सूर्यप्रकाशाशिवाय हे दिवे सुरू राहू शकतील. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हाय मास्ट प्रोजेक्टचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात बसवण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांची सुरक्षिततेसोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे.