याबाबत अधिक माहिती अशी की, कराड बस स्थानक परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीतून तीन दिवसांपूर्वी अखिलेशने एक नवीन मोबाईल घेतला होता. मात्र, त्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित काम करत नसल्याने तो बदलून घेण्यासाठी तो रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसोबत दुकानात गेला होता.
त्यावेळी मोबाईल बदलण्यावरून दुकान मालक आणि अखिलेश यांच्यात वाद सुरू झाला. त्याचवेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू होते. अखिलेशच्या चपलेने फरशी घाण झाल्यामुळे वाद अधिकच वाढला. यावेळी दुकानातील कर्मचाऱ्याने अखिलेशला जोरदार धक्का दिला. यामुळे तो अचानक जमिनीवर पडला.
advertisement
अखिलेश जमिनीवर पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कराड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.