कराड पंचायत समितीत 6 ठिकाणी ओबीसी जागांसाठी राखीव असून त्यातील 3 ठिकाणी महिला आरक्षण राहणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 3 जागा राखीव असून त्यापैकी 2 ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. तर 15 पंचायत समितीचे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून त्यातील 7 जागा या महिलांसाठी राखीव राहतील.
गेल्या पंचवार्षिकला काय चित्र होते? यावेळी काय होणार?
advertisement
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड पंचायत समितीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि पूर्वीचे काँग्रेसचे आणि सध्याचे राष्ट्रवादी अजित दादा पवार गटात असलेले एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटाची सत्ता होती. यापूर्वी भाजपाला कराड पंचायत समितीत कधीही सदस्य पाठवता आला नाही. मात्र यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आणि कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्यामुळे पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकेल का? अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे.
कराड पंचायत समितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण- पाल, तळबीड, मसूर, कोपर्डे हवेली, कोयना वसाहत, कोळे, सवादे, रेठरे बु
सर्वसाधारण महिला- कालवडे, वाघेरी, येळगाव, वडोली भिकेश्वर, सुपने, शेरे, विंग
ओबीसी- तांबवे, गोळेश्वर, काले (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ओबीसी महिला- कार्वे,चरेगाव, उंब्रज
अनुसूचित जाती प्रवर्ग- वारुंजी
अनुसूचित जाती महिला- सैदापूर,हजारमाची