माझी आई मनोरमा शर्मा, माझा ड्रायव्हरचा मर्डर केला. माझ्या बहिणीवर अत्याचार झाला. स्वतःच्या बायकोला न्याय देता आला नाही तो समाजाला काय न्याय देणार असा सवाल करुणा मुंडे यांनी केला आहे. माझ्या आईने यांच्या दबावात आत्महत्या केली. माझ्या बहिणीने नंतर सांगितले तेव्हा मला कळलं. चार पाच दिवस आधी मी जरांगे पाटील यांची भेट घेऊन न्याय मागितला. त्यांनी घरगुती मॅटरमध्ये पडत नाही असं सांगितलं.
advertisement
माझी बहीण काय न्याय मागणार? करुणा मुंडेंचा सवाल
मला वाल्मिक कराडने जिल्हाधिकारी कार्यालयात मारले हे सर्वांना माहीत आहे. माझ्यावर वेगवेगळे केसेस केल्या आहेत. माझ्या मागे मोठी सत्ता आहे. माझी बहीण काय न्याय मागणार, ती इंदौरला निघून गेली. तिला पाठिंबा मिळाला तर ती पण बोलेल,असेही करुणा मुंडे म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी अगोदर सांगितले होते की अंगावर आले, तर शिंगावर घ्या, त्या अगोदर पंकजा मुंडे यांनी देखील कोयते घासून ठेवा, असे म्हटले होते . हे फक्त आपल्या समाजाच्या लोकांसाठी आहे. हे लोक स्वतः काही करत नाही. फक्त लोकांनी करायचं. मी अंगावर गेले होते, परळी विधानसभेमध्ये अर्ज देखील भरला होता. पण माझा अर्ज अवैध ठरवण्यात आला. अर्जाचा सूचक होता, त्याला उचलून नेले. दमदाटी केली. मी अंगावर आली होती, घ्यायचं होतं शिंगावर होऊन जाऊन द्यायचे होते, नवरा-बायकोमध्ये लढाई. पण तुम्ही तसं केलं नाही. मोठ्या मोठ्या भाषणामध्ये लोकांची दिशाभूल करणार. कोयते घासून ठेवा, अंगावर आले तर शिंगावर घ्या, एवढचं म्हणत राहणार.