सुरक्षेसाठी विशेष व्यवस्थापन
नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये दोन पोलीस अधीक्षक, 12 उपअधीक्षक, 100 पोलीस उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक आणि सुमारे अडीच हजार पोलिसांचा समावेश असेल. हे सर्व कर्मचारी तीन सत्रांमध्ये काम करतील.
एआय कॅमेऱ्यांचे फायदे
- गर्दी नियंत्रण : 6 ठिकाणी बसवलेल्या एआय कॅमेऱ्यांमुळे कोणत्या भागात गर्दी वाढली आहे, हे तात्काळ कळेल.
- हरवलेल्या व्यक्तींचा शोध : जर एखादी व्यक्ती हरवली, तर तिचा फोटो या प्रणालीमध्ये अपलोड केल्यास ती व्यक्ती शेवटची कुठे दिसली होती, याचा माग काढता येईल.
advertisement
या व्यतिरिक्त, तुळजापूर शहरात वाहतूक आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तब्बल 600 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने यंदाच्या नवरात्रोत्सवात भाविकांना सुरक्षित, सुरळीत आणि व्यवस्थित दर्शन मिळावे, यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे.
विशेष धार्मिक कार्यक्रम
- 26 सप्टेंबर : ललिता पंचमी
- 30 सप्टेंबर : दुर्गाष्टमी
- 1 ऑक्टोबर : महानवमी
- 2 ऑक्टोबर : विजयादशमी/दसरा
या दिवशी वैदिक होम, हवन, शस्त्रपूजन आणि शमीपूजन असे विशेष धार्मिक सोहळे होणार आहेत.
इतर कार्यक्रम
- 6 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा निमित्त विशेष पूजा.
- 7 आणि 8 ऑक्टोबर : मंदिर पौर्णिमा आणि अन्नदान महाप्रसादाचे आयोजन. या काळात लाखो भाविक तुळजापूरला दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाचे वेळापत्रक
- 23 ते 25 सप्टेंबर: दररोज देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना मिरवणूक.
- 26 सप्टेंबर (ललिता पंचमी) : रथ अलंकार महापूजा आणि रात्री छबिना.
- 27 सप्टेंबर : मुरली अलंकार महापूजा.
- 28 सप्टेंबर : शेषशायी अलंकार महापूजा.
- 29 सप्टेंबर : भवानी तलवार अलंकार महापूजा.
- 30 सप्टेंबर (दुर्गाष्टमी) : महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी वैदिक होम व हवन आणि रात्री छबिना मिरवणूक.
- 1 ऑक्टोबर (महानवमी): देवीची महापूजा, होमावरील धार्मिक विधी आणि पालखी मिरवणूक.
- 2 ऑक्टोबर (विजयादशमी/दसरा) : पहाटे सिमोल्लंघन, शिबीकारोहण, मंदिर परिसरात मिरवणूक, मंचकी निद्रा आणि शमीपूजन.
- 6 ऑक्टोबर (कोजागिरी पौर्णिमा) : विशेष धार्मिक पूजा.
- 7 ऑक्टोबर (मंदिर पौर्णिमा) : पहाटे देवीची प्रतिष्ठापना, रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना आणि जोगवा.
- 8 ऑक्टोबर (बुधवार) : नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद आणि रात्री छबिना.
हे ही वाचा : नवरात्रीत कोल्हापूरला जाताय? फक्त अंबाबाईच नाही, तर 'ही' 7 प्राचीन मंदिरे तुमची यात्रा करतील पूर्ण, वाचा सर्व माहिती
हे ही वाचा : Navratri Special : देवीच्या दर्शनासाठी यायचंय? सप्तशृंगगडावर भाविकांसाठी यंदा खास व्यवस्था, वाचा कसं आहे नियोजन!