गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावातील ही घटना आहे. दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादामधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरुवारी दत्त जयंतीच्या सोहळ्यात गावातील नागरिकांनी महाप्रसाद खाल्ला होता. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला.
गावातील जवळपास दीडशे ते दोनशे जणांना उलट्या, पोटात मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात गेल्यानंतर विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. रुग्णांवर गडहिंग्लजमधील नेसरी ग्रामीण रुग्णालयात आणि गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे.
advertisement
आरोग्य यंत्रणेची तारांबळ
जवळपास दीडशे ते दोनशे नागरिकांना एकाच वेळी विषबाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. खाटांची संख्या कमी पडल्याने रुग्णांवर जमिनीवरच उपचार करण्याची वेळ ओढावली. बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
