Krushi Market: कांद्याची आवक वाढली, पण दर घसरलेलेच, सोयाबीन आणि मक्याला काय मिळाला भाव?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मुंबई: शुक्रवार, दिनांक 5 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मका दराची घसरगुंडी कायम
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 37 हजार 335 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 8 हजार 120 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1400 ते जास्तीत जास्त 1534 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 31 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 1800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 54 हजार 182 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 49 हजार 165 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 309 ते 1855 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 6760 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 200 ते 3111 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक स्थिर
view commentsराज्याच्या मार्केटमध्ये 25 हजार 167 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. जालना मार्केटमध्ये 5 हजार 726 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4050 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 2503 क्विंटल सोयाबीनला प्रतीनुसार 3970 ते 5490 रुपये विक्रमी बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 05, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market: कांद्याची आवक वाढली, पण दर घसरलेलेच, सोयाबीन आणि मक्याला काय मिळाला भाव?

