सांगली: आपल्याकडे आहाराचं वर्गीकरण शाकाहारी आणि मांसाहारी असं केलं जातं. काही लोक शाकाहारी तर काही मांसाहारी असतात. पण एखादं संपूर्ण गावच शाकाराही असल्याचं तुम्हाला माहितीये का? सांगलीच्या खानापूर तालुक्यातील रेणावी हे 'शाकाहारी गाव' म्हणून ओळखलं जातं. घाटमाथ्यावरील रेणावी खरंच शाकाहारी गाव आहे का? काय आहेत त्याची कारणे? याबद्दल लोकल 18 च्या प्रतिनिधींनी रेणावी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला.



