TRENDING:

कोल्हापूरकरांचा नाद करता का राव! मटण उधारी वसुलीचा अनोखा पॅटर्न, सदल्या काशिदाची पंचक्रोशीत चर्चा

Last Updated:

Kolhapur News: सदल्या काशिदच्या दुकानातून उधारीवर मटण नेलेल्या ग्राहकांचे आता अक्षरशः धाबे दणाणले आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर :गावाकडच्या छोट्या दुकानांमध्ये उधारीवर व्यवहार करणे ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, या उधारीमुळे दुकानदारांची अडचणही वाढते. अशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर गावातल्या एका मटण विक्रेत्याला आली. ग्राहकांकडील उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी त्याने एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. गावच्या चौकात त्याने मोठा बोर्ड लावून त्यावर एकूण उधारीची रक्कम नमूद केली असून, दिवाळीपूर्वी पैसे न भरल्यास उधारीदारांची नावे जाहीरपणे लिहिण्याचा इशारा दिला आहे.
News18
News18
advertisement

हा फलक लागल्यापासून गावात आणि परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. उधारीमुळे वैतागलेल्या दुकानदाराने उघडपणे दिलेला इशारा दिला आहे. दुकानातून उधारीवर मटण नेलेल्या ग्राहकांचे आता अक्षरशः धाबे दणाणले आहेत. दिवाळी जवळ आल्यामुळे नावे उघड होण्याच्या भीतीने लोक पैसे देतील अशी अपेक्षा मटण विक्रेत्या दुकानदाराला आहे. दुकानदाराचे नाव सदल्या काशिद आहे.

कोल्हापूरकर काय म्हणाले?

advertisement

मटण विक्रेत्याचा हा निर्णय काहींना पटला असून, उधारी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी हा योग्य मार्ग आहे असे मत कोल्हापूरकर मांडत आहेत. गावोगावी दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात उधारी थकली जाते. कधी ग्राहक पैसे न देता टाळाटाळ करतात तर कधी महिनोनमहिने वसुली होत नाही. अशावेळी बहिरेश्वरातील या मटण दुकानदाराने घेतलेली ही सार्वजनिक फजितीची धमकी उधारीदारांसाठी मोठा धक्का ठरत आहे.

advertisement

काय लिहलंय फलकावर?

लवकरात लवकर उधारी जामा करावी

एकूण उधारी 54, 750 रुपये फक्त

उधारी जमा झाली नाही तर दिवाळीत बोर्डवर नावे येतील

आपली उधारी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी संपर्क करा, नंतर तक्रर ऐकून घेतली जाणार नाही

उधारी करणे/मागणे आपला हक्क आहे...

पैसे देणे आपले कर्तव्य आहे...

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बंद होणार होती ZP शाळा, आज ठरली जगातली नंबर वन School, पाहावी अशी स्टोरी! Video
सर्व पहा

सोशल मीडियावरही या बोर्डचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी दुकानदाराच्या धाडसाचे कौतुक केले आहे, तर काहींनी हे "अत्यंत टोकाचे पाऊल" असल्याचे म्हटले आहे. मात्र, दिवाळीपूर्वी उधारी वसूल करण्यासाठी गावच्या चौकातील हा फलक किती प्रभावी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापूरकरांचा नाद करता का राव! मटण उधारी वसुलीचा अनोखा पॅटर्न, सदल्या काशिदाची पंचक्रोशीत चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल