TRENDING:

सतेज पाटील यांना धक्का, खंदा समर्थक एकनाथ शिंदे गटात, महापालिका निवडणुकीपूर्वी झटका

Last Updated:

Kolhapur News: शारंगधर देशमुख यांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी हवी होती. मात्र पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने ते नाराज होते. आज त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : पुढील तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने आघाडी घेतली आहे. गुरुवारी अक्कलकोटमधील माजी मंत्री सिद्धराम मेहेत्रे यांनी धनुष्यबाण हाती घेतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, सतेज पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शारंगधर देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने सतेज पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.
शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली
शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली
advertisement

विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षात असलेली अस्वस्थता समोर आली होती. शारंगधर देशमुख यांनाही कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी हवी होती. मात्र पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने ते नाराज होते. आता महापालिका निवडणुकीआधी त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याची समजते.

शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शारंगधर देशमुख यांनी भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर देखील उपस्थित होते. या भेटीत शिंदे आणि देशमुख यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. पक्षप्रवेशाचा मुहूर्त लवकरच अंतिम करू, असे चर्चेअंती ठरल्याचे कळते.

advertisement

सतेज पाटील यांचा खंदा समर्थक एकनाथ शिंदे गटात

शारंगधर देशमुख यांची ओळख सतेज पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून आहे. देशमुख काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते होते. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने सतेज पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे. महापालिका निवडणुकीआधी देशमुख यांच्यासह काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे.

advertisement

काँग्रेसचे ३५ नगरसेवक शिंदे सेनेत?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

महापालिका निवडणुकीआधी विरोधकांचे बळ कमी करू. किंबहुना पदाधिकारी पलीकडच्या बाजूला राहायला तयार नाहीत. विकासकामांनी ते भारावून गेले आहेत. काँग्रेसचे ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सतेज पाटील यांना धक्का, खंदा समर्थक एकनाथ शिंदे गटात, महापालिका निवडणुकीपूर्वी झटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल