TRENDING:

Kolhapur News : कोल्हापूरला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? सतेज पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा; पण...

Last Updated:

Kolhapur News : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पदासाठी काँग्रेसचे आमदार..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पदासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, हे पद काँग्रेसकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

'मविआ'मध्ये पदाची विभागणी

महाविकास आघाडीच्या सध्याच्या रचनेत विधान परिषदेत एकूण 16 सदस्य आहेत. यापैकी काँग्रेसचे सर्वाधिक 7, उद्धवसेनेचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) 3 सदस्य आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धवसेनेकडे जाणार असल्याने, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने स्वाभाविकपणे दावा केला आहे.

...म्हणून सतेज पाटील यांचे नाव पुढे

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. त्यांनी शक्तिपीठ महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांसह राज्यातील अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांचे उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि मोठा जनसंपर्क यामुळे काँग्रेसने त्यांचे नाव या पदासाठी पुढे आणले आहे. या संदर्भात बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, "महाविकास आघाडीमध्ये या पदासाठी प्राथमिक चर्चा सुरू आहे, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही."

advertisement

हे ही वाचा : Jayant Patil : 'विशाल पाटील कधी काय करतील नेम नाही', जयंत पाटलांचा मिश्किल टोला, 'तिकडे गेलेले काहीजण...'

हे ही वाचा : Dasara Melava : ठाकरे की शिंदें? दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर आवाज कोणाचा? समोर आली मोठी अपडेट

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur News : कोल्हापूरला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? सतेज पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा; पण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल