कोल्हापूर : गेल्या 10 दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण भक्तिमय करुन टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पहिला मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या तुकाराम माळी तालीम मंडळ बाप्पांच्या पूजनाने होतो.
नुकताच हा सोहळा शासकीय पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पार पडला. तसेच काही वेळापूर्वी कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये महिलांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या विसर्जन मिरवणुकीमध्ये एकाच रंगाच्या साड्या परिधान करून महिला सहभागी झाल्या आहेत.
advertisement
विसर्जन मिरवणुकीमध्ये फुगड्या, पारंपरिक गाणी म्हणत आपल्या लाडक्या बापाला निरोप दिला जात आहे. यंदाच्या मिरवणुकीत कोल्हापूरच्या समस्या आणि फुटबॉलच्या प्रश्नावर भर देण्यात आला आहे.
मंडळाच्या शेकडो महिला कार्यकर्त्या एकसारखी वेशभूषा परिधान करून झिम्मा-फुगडी खेळत मिरवणुकीत सहभागी झाल्या आहेत. तसेच पुरुष कार्यकर्तेही पांढरा पोशाख, भगवी टोपी आणि फेटे घालून सहभागी झाले आहेत. यामुळे तालमीची मिरवणूक कायम शहरवासियांच्या उत्सुकतेचा विषय ठरते. यावेळी मंडळाने कोल्हापूरच्या हद्दवाढ, खड्डे आणि कोल्हापुरकरांच्या जिव्हाळ्याचा फुटबॉलच्या प्रश्नांवर भाष्य केले आहे.
नाकाला जीभ लावूनच दाखवली! पुण्यातील 76 वर्षांच्या आजोबांची गिनीज बुकात नोंद, VIDEO
यंदा मिरवणुकीत लेसर लाईटवर बंदी -
जिल्हा प्रशासनामार्फत 12 ते 17 सप्टेंबर या काळात लेसर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळांना लेसर लाईट लावता येणार नाहीत. या नियमांच उल्लंघन केलं तर त्या मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
बीडच्या तरुणाची कमाल!, नोकरी नव्हे तर वडापाव विकून कमावतोय लाखो रुपये, VIDEO
रात्री 12 नंतर मंडळांवर निर्बंध आणि..
न्यायालयाच्या आदेशानुसार एका मर्यादेपर्यंत म्हणजेच साऊंड सिस्टीमची 70 डेसिबलची मर्यादा ओलांडली तर त्या मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंतच साऊंड सिस्टीमला परवानगी आहे. त्यानंतर पोलीस साऊंड सिस्टीमचा आवाज बंद करणार आहेत.