का गरजेची आहेत अग्निशमन स्थानके?
2011 च्या जनगणनेनुसार, एक लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन स्थानक असा नियम आहे. त्यानुसार कोल्हापुरात सध्या सहा स्थानके पुरेसी आहेत. मात्र, गेल्या 14 वर्षांत जनगणना झालेली नाही, त्यामुळे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भविष्यात हद्दवाढ झाल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना मदत पोहोचवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, अग्निशमन विभागाने किमान तीन नवीन स्थानके सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यासाठी अग्निशमन विभागाने नगररचना विभागाकडे जागा शोधण्याची विनंती केली आहे. सध्या शहराचा नवीन विकास आराखडा तयार होत असल्याने, त्यातच ही जागा आरक्षित ठेवणे सोपे होईल.
advertisement
कुठे शोधली जात आहे जागा?
नवीन अग्निशमन स्थानकांसाठी मार्केट यार्ड, शांतीनिकेतन, कळंबा, आपटेनगर अशा उपनगरांमध्ये जागेचा शोध घेतला जात आहे. शहराच्या जुन्या गावठाण भागात सध्या स्थानकांची तितकीशी गरज नाही, पण वाढत्या उपनगरांत त्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे नगररचना आणि अग्निशमन विभाग हे दोन्ही विभाग मिळून उपनगरांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
जर या भागांमध्ये योग्य जागा उपलब्ध नसतील, तर त्या आरक्षित करून ताब्यात घेतल्या जातील, अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात बोलताना मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सांगितले की, "शहराचा वाढता विस्तार आणि संभाव्य हद्दवाढ विचारात घेऊन आम्ही नगररचना विभागाला नवीन तीन स्थानकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे."
हे ही वाचा : अरबी समुद्रात वारं फिरलं! 17 जिल्ह्यांत अलर्ट, 4 दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा
हे ही वाचा : कोल्हापुरात चोरट्यांचं खतरनाक धाडस! भरदुपारी-भरवस्तीत फोडलं घर, चोरी 'इतकी' मोठी की, पोलिसांचीही उडाली झोप!