TRENDING:

Kolhapur News: कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 'या' 6 जिल्ह्यांचा समावेश; उद्घाटन समारंभाची तारीख बदलली!

Last Updated:

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा 16 ऐवजी 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सूचनेनुसार...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ 16 ऐवजी 17 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. सर्किट बेंच उद्घाटनाचा हा ऐतिहासिक क्षण सर्वसामान्यांना अनुभवता यावा, यासाठी सार्वजनिक ठिकाणी समारंभाचे आयोजन करण्याचा विचार सुरू आहे. असा निर्णय झाल्यास, दसरा चौकात उद्घाटन सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Circuit Bench, Kolhapur
Circuit Bench, Kolhapur
advertisement

तारीख बदलण्याचे कारण

यापूर्वी जिल्हा बार असोसिएशनने सर्किट बेंचचा उद्घाटन समारंभ 16 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्याच दिवशी सरन्यायाधीश गवई हे मंडणगड येथील एका समारंभात उपस्थित राहणार असल्याने, त्यांनी कोल्हापुरातील कार्यक्रम 16 ऐवजी 17 ऑगस्टला घेण्याची सूचना केली. त्यानुसार आता 17 ऑगस्टला उद्घाटन समारंभ निश्चित करण्यात आला आहे.

advertisement

कार्यक्रमाचे ठिकाण दसरा चौकच का?

कार्यक्रमाचे ठिकाणही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसरा चौकातील मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल चर्चा सुरू आहे. ऐनवेळी ठिकाणात बदल झाल्यास हाताशी पर्याय असावा, यासाठी जिल्हा बार असोसिएशनने खासदार शाहू छत्रपती यांच्याकडे दसरा चौकातील मैदानासाठी पत्रव्यवहार केला आहे. याच दरम्यान, सर्किट बेंचबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

advertisement

सर्किट बेंचमध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची अधिसूचना झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 4 ऑगस्ट) याबाबतची नोटीस जाहीर केली. या नोटीसमध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा समावेश सर्किट बेंचमध्ये असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि गोव्यानंतर कोल्हापूरचा समावेश असल्याचे यात नमूद केले आहे.

advertisement

सर्किट बेंचमध्ये कोणत्या कामांचा समावेश असणार?

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांनी 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाहीची प्रतीक्षा होती. या नोटिसीद्वारे उच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये कोणत्या प्रकारची कामे चालतील याची माहितीही दिली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सर्व अपील्स (Appeals), ॲप्लीकेशन्स (Applications), रेफरन्स (Reference) आणि पिटीशन्स (Petitions) दाखल होणार आहेत. यामध्ये राज्यघटना कलम 226 आणि 227 अंतर्गत येणाऱ्या कामांचाही समावेश आहे.

advertisement

हे ही वाचा : माधुरी हत्तीला 'वनतारा'मध्ये का पाठवण्यात आले? PETA अधिकाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
35 वर्षांपासून जपलाय वारसा, मुंबईतील प्रसिद्ध वडापाव, 20 रुपयांत मन होईल तृप्त
सर्व पहा

हे ही वाचा : Rahul Gandhi: "खरे भारतीय असता तर हे बोलला नसता”; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News: कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 'या' 6 जिल्ह्यांचा समावेश; उद्घाटन समारंभाची तारीख बदलली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल