TRENDING:

धक्कादायक! वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत वाद; पतीने भररस्त्यात होर्डिंगला गळफास घेऊन संपवलं जीवन

Last Updated:

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे तानाजी गायकवाड यांनी वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत झालेल्या वादामुळे आत्महत्या केली. पट्टणकोडोली येथे कुटुंबासोबत राहणारे तानाजी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हातकणंगले : वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत झालेल्या वादानंतर, रागाच्या भरात एका पतीने अतिशय टोकाचे पाऊल उचलले आणि स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. ही दुर्दैवी घटना हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे घडली असून, तानाजी गायकवाड असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे रुकडी परिसरात शोककळा पसरली आहे.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

नेमके काय घडले?

तानाजी गायकवाड हे लग्न झाल्यापासून पट्टणकोडोली येथे पत्नी आणि मुला-बाळांसोबत राहत होते. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. मागील पंधरा दिवसांपासून त्यांची वृद्ध आई आजारी असल्याने, ते आईची सेवा करण्यासाठी रुकडी येथील त्यांच्या घरी आले होते.

आईच्या सेवेवरून वाद विकोपाला गेला

आजारी आईला भेटण्यासाठी घरी रोज पाहुणे येत होते, यावरून तानाजी आणि त्यांच्या पत्नीमध्ये दररोज रात्री भांडण होत होते. रविवारी तानाजींची बहीण आईला भेटायला आली. आईची अवस्था पाहून दोघा भावंडांमध्ये वाद झाला, आणि याच वादात तानाजींच्या पत्नीने भाग घेतला. हा वाद विकोपाला गेला. याच वादातून रागाच्या भरात तानाजी यांनी आपली दुचाकी घेतली आणि घराबाहेर पडले.

advertisement

रविवारी रात्री कुटुंबीयांनी तानाजींचा खूप शोध घेतला, पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर, सोमवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने अतिग्रे-इचलकरंजी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ होर्डिंग बोर्डवर एका अनोळखी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना कळविली.

तपासानंतर ओळख पटली

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी तानाजी यांचा पत्ता शोधून काढला आणि ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. तानाजींना दोन मुली असून, त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता, तानाजींनी आईच्या सेवेवरून झालेल्या वादातून रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून समजले आहे.

advertisement

हे ही वाचा : सांगलीच्या, खत विक्रेत्यांनो लक्ष द्या! 10 ऑगस्टपर्यंत 'ई-पॉस' मशीन घ्या, नाहीतर...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन, रेल्वेत विकले पेन, अंधत्वावर मात करत मिळवली नोकरी
सर्व पहा

हे ही वाचा : सेवा केंद्र की पिळवणूक केंद्र? 'या' महा-ई-सेवा केंद्रांना ठोकणार ताळे, आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! 

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
धक्कादायक! वृद्ध आईच्या सेवेवरून पत्नीसोबत वाद; पतीने भररस्त्यात होर्डिंगला गळफास घेऊन संपवलं जीवन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल