सेवा केंद्र की पिळवणूक केंद्र? 'या' महा-ई-सेवा केंद्रांना ठोकणार ताळे, आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! 

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील 'महा-ई-सेवा' केंद्रांमधून आधारकार्ड, पॅनकार्ड, दाखले अशा कामांसाठी मनमानी पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी...

Maha-e-Seva centers
Maha-e-Seva centers
सातारा : नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी सरकारने सुरू केलेली महा-ई-सेवा केंद्रे आता 'सरकारी मान्यतेने पिळवणूक' करणारी केंद्रे बनली आहेत, अशी तक्रार वाढत आहे. अशाच मनमानी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या केंद्रांच्या कार्यप्रणालीत सुधारणा न झाल्यास, संबंधित केंद्रे बंद केली जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण
महा-ई-सेवा केंद्रांमधून आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, सात-बारा, आठ-अ, रेशनकार्ड दुरुस्ती, नावे कमी-जास्त करणे, जन्म-मृत्यूचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. पूर्वी या कामांसाठी सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागत असे, ते कमी व्हावे या उद्देशाने सरकारने ही केंद्रे सुरू केली होती. परंतु अलीकडे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक केंद्रांवर काम पूर्ण करण्यासाठी मनमानी पैसे उकळले जातात आणि त्याची पावतीसुद्धा दिली जात नाही, अशी तक्रार अनेकांनी प्रशासनाकडे केली आहे.
advertisement
ई-सेवा केंद्रांचं काम काय?
नागरिकांचे अर्ज जमा करून घ्यायचे, ते एकत्र करून सरकारी कार्यालयात द्यायचे, त्यावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायचे आणि ते संबंधित दाखले नागरिकांना द्यायचे. या कामाचे विविष्ट दरपत्रक ठरवून दिलेले आहे. तर दरपत्रक लावायचे. या कामांव्यतिरिक्त कोणतीही कामं करायची नाही, असे स्पष्ट नियम आहेत.
'ई-सेवा' केंद्रांचे होणार मूल्यमापन!
नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्देशानुसार, लवकरच एक समिती अचानक महा-ई-सेवा केंद्रांवर धडक देणार आहे.
advertisement
या तपासणीत काय पाहिले जाईल?
  • केंद्रांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता तपासली जाईल.
  • नागरिकांना वेळेत सेवा मिळते की नाही, हे पाहिले जाईल.
  • गैरव्यवहार, अपुऱ्या सुविधा आणि कामात होणारी दिरंगाई शोधली जाईल.
  • कार्यक्षम केंद्रांना प्रोत्साहन दिले जाईल, तर निष्क्रिय आणि मनमानी करणाऱ्या केंद्रांवर कारवाई केली जाईल.
  • केंद्रचालकांना आवश्यक सूचना दिल्या जातील.
या मूल्यमापनानंतरही सुधारणा न झाल्यास, संबंधित केंद्रांना टाळे ठोकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
सेवा केंद्र की पिळवणूक केंद्र? 'या' महा-ई-सेवा केंद्रांना ठोकणार ताळे, आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! 
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement