काय आहे कोल्हापूर कनेक्शन?
लालबागच्या राजाचे मुख्य पुजारी असणारे अरविंद वेदांते गुरुजी हे मूळचे कोल्हापुरातील आहेत. त्यांचं मूळ गाव बहिरेश्र्वर आहे. तर ते सध्या फुलेवाडी येथे वास्तव्य करतात. मात्र गेली कित्येक वर्ष सातत्य राखत दरवर्षी ते लालबागच्या राजाची सेवा करायला कोल्हापूरहून मुंबईला जात असतात.
कोल्हापुरात अवतरणार केदारनाथ मंदिर, 50 फूट भव्य असेल मूर्ती, Video
advertisement
कशी झाली सुरूवात?
लालबागचा राजा गणेशमंडळाकडून गणेशाची पूजा करण्यासाठी मालवणच्या एका पटवर्धन भटजींना नेमण्यात आले होते. त्यांच्या पश्चात अरविंद वेदांते हे 1980 साली लालबागच्या राजाची पूजा करु लागले. वेदांते हे त्या काळी मुंबईत शिक्षण घेण्यास गेले होते. पटवर्धन यांच्याशी वेदांते यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्याकडून शास्त्रोक्त ज्ञान देखील वेदांते घेत होते. त्यातच पटवर्धन यांच्यानंतर अरविंद वेदांते यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून गणपतीच्या पूजाविधी संदर्भात विचारणा झाली. तेव्हापासून आजतागायत अरविंद वेदांते हेच लालबागच्या राजाचे मुख्य पुजारी आहेत.
पंचमुखी गणेशाचं एकमेव मंदिर; मोहक मूर्तीचं पाहा काय आहे वैशिष्ट्य
कोणते विधी करतात?
अरविंद वेदांते हे गणेशोत्सव काळात दहा दिवस कोल्हापूरहून मुंबईला जाऊन लालबागच्या राजाची पूजाअर्चा करत असतात. मात्र गणेशोत्सवाव्यतिरिक्त लालबागच्या राजाचा मुहूर्त किंवा पाद्यपूजन सोहळा, मंडप पूजन अशा सोहळ्यांवेळी देखील वेदांते गुरुजींनाच बोलावले जाते. गणेशोत्सव काळात तर त्यांना बोलायला देखील वेळ मिळत नसतो. रोज सकाळी 5.30 ते रात्री 9.30 वाजताची आरती होईपर्यंत वेदांते गुरुजी लालबाग राजाच्या पायांजवळ थांबलेले असतात. येणाऱ्या प्रत्येक भक्ताकडून पूजा साहित्य, हारतुरे, प्रसाद स्विकारून तो देवाला अर्पण करतात. त्याच बरोबर देवाचे पूजन, आरती या सर्व गोष्टी वेदांते गुरुजींच बघत असतात.
गरीब-श्रीमंत, लहान-मोठे अशा सर्वांचीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. यामध्ये उद्योगपती, कलाकार, राजकारणी, खेळाडू कित्येक थोरामोठ्यांचा देखील समावेश असतो. या प्रत्येकाचे काही ना काही मागणे लालबागच्या राजाकडे असते. या सर्वांचा नमस्कार पूजाविधी करत राजापर्यंत पोहोचवण्याचे पुण्यकर्म मला करायला मिळणे हेच मी भाग्य समजतो. जीवात जीव असेपर्यंत सर्वांच्याच लाडक्या बाप्पाची सेवा करायला मिळो, अशी इच्छा वेदांते यांनी बोलून दाखवली.