कोल्हापुरात अवतरणार केदारनाथ मंदिर, 50 फूट भव्य असेल मूर्ती, Video

Last Updated:

कोल्हापुरकरांना यंदाच्या गणेशोत्सवात केदारानाथंचं भव्य मंदिर अनुभवता येणार आहे.

+
News18

News18

कोल्हापूर, 18 सप्टेंबर :  गणेशोत्सवात गावातली प्रसिद्ध मंडळ कोणता देखावा करणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. कोल्हापूरच्या गणेशोत्सवालाही एक खास परंपरा आहे. शाहूपुरी भागातले राधाकृष्ण मंडळ हे एक नावाजलेलं मंडळ आहे. हे मंडळ दरवर्षी एखादं मंदिर किंवा राजवाड्याची भव्य आणि हुबेहुब प्रतिकृती सादर करतं. यंदा हे मंडळ केदारनाथ धामची प्रतिकृती सादर करणार आहे.
राधाकृष्ण मंडळाची स्थापना 1981 साली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केली. त्यावेळी लहान प्रमाणात मांडव घालून सुरुवात झालेले राधाकृष्ण मंडळ आज भव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा करते. आत्तापर्यंत मंडळाने अनेक राजवाडे आणि मंदिराचे मोठमोठ्या प्रतिकृती साकारलेल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना गणेशोत्सव काळात इथे आल्यानंतर अगदी खऱ्या ठिकाणी भेट दिल्यासारखे वाटत असते, असे मंडळाचे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी सांगितले.
advertisement
या मंडळाकडून सुरुवातीला मदुराईचे मीनाक्षी मंदिर, सर्वधर्म समभाव मंदिर, नटराज मंदिर, म्युझिक लाईट, हवा महल, अक्षरधाम मंदिर, इस्कॉन टेम्पल, बेंगलोर मधील आर्ट ऑफ लिविंगचे मंदिर, आंध्र मधील वेल्लोरचे गोल्डन टेम्पल, दिल्लीचे लोटस टेम्पल, जेजुरीचा खंडोबा, अमेरिकेतील डिज्नी वर्ल्ड, थायलंड मधील बुद्ध टेम्पल अशा विविध मंदिराच्या आणि राजवाड्यांच्या प्रतिकृती केलेल्या आहेत, असेही कपिल चव्हाण यांनी सांगितले आहे.
advertisement
यंदा काय असणार आकर्षण?
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मंडळाकडून सर्व तयारी सूरु असून मंडळाचे यंदाचे 43 वे वर्ष आहे. यावेळी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती उभी केली जात आहे. या मंदिराचे काम गेले दोन महिने चालू असून 25 ते 30 कुशल कारागीर हे मंदिर बनवत आहेत, असे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माधव शुक्ल यांनी सांगितले आहे.
advertisement
कसं असेल केदारनाथ मंदिर ?
मंडळाकडून साकारण्यात येत असलेले केदारनाथ मंदिर हे भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराची उंची ही 50 फूट असणार आहे. तर 40 फूट रुंद आणि 80 फूट लांब असा मंदिराचा गाभारा असणार आहे. मंदिरात समोरून प्रवेश केल्यानंतर महादेवाची पिंड समोर पाहायला मिळेल. त्याच्या मागे गणपतीची उत्सवमूर्ती आणि प्रतिष्ठापना केलेली मुर्ती असणार आहे. तिथून दर्शन घेऊन पुढे डाव्या बाजूच्या दरवाज्यातून मंदिराच्या मागच्या बाजूला जाता येणार आहे. तिथे केदारनाथ मंदिराच्या मागे असणाऱ्या भीमशिळेचे देखील नागरिकांना दर्शन घेता येणार आहे. तसेच पुढे जाऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून नागरिकांना बाहेर जाता येणार आहे.
advertisement
गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मंडळामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गणेश याग, दूधाचा संततधार अभिषेक हे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देखावा पहिला दिवसापासून चालू होत आहे, असेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापुरात अवतरणार केदारनाथ मंदिर, 50 फूट भव्य असेल मूर्ती, Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement