55 लाख लाखांचे दागिने लंपास
ही घटना सोमवारी घडली. चोरट्यांनी डॉ. परितेकर यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी थेट बेडरूममधील लाकडी कपाट फोडून त्यातील सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लंपास केले. यामध्ये तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, विविध अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट आणि हिऱ्याचे टॉप्स यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 55 लाख रुपये इतकी आहे. दागिने चोरताना चोरट्यांनी कपाटात ठेवलेली 25 हजार रुपयांची रोकडही घेऊन पलायन केले.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि तपास सुरू केला. गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अद्यापही या प्रकरणात कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.
सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या घरात आणि तेही दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यू शाहूपुरीसारख्या भागात चोरी करण्यासाठी चोरट्यांनी दाखवलेले धाडस पाहून स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांना पकडावे आणि शहरात सुरक्षिततेची भावना पुन्हा निर्माण करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेने कोल्हापूर शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.