TRENDING:

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, या बँकेने जाहीर केली नवी योजना, कसा मिळेल लाभ?

Last Updated:

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आणखी एक खूशखबर आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेकडून खास योजना जाहीर करण्यात आलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आणखी एक खूशखबर आहे. लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या महिलांना कोल्हापूर जिल्हा बँकेकडून विशेष योजना जाहीर करण्यात आलीये. या योजनेतून 30 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण साधले जाईल, तसेच सावकारी आणि मायक्रो फायनान्सकडून होणारी जादा व्याजाची आर्थिक पिळवणूक थांबवण्यास मदत होणार आहे.
Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी खास ऑफर, या बँकेने जाहीर केली नवी योजना, कसा मिळेल लाभ?
Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी खास ऑफर, या बँकेने जाहीर केली नवी योजना, कसा मिळेल लाभ?
advertisement

'ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना 

या योजनेअंतर्गत बँकेत पैसे जमा होणाऱ्या 1,38,158 महिलांना 10 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. हा उपक्रम आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी महिलांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. कारण त्यांना आता जादा व्याजदराने कर्ज घेण्याची गरज राहणार नाही. "कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सहज उपलब्ध होणाऱ्या कर्ज योजनांद्वारे त्यांना सशक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे महिलांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी आर्थिक मदत मिळेल," असे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

advertisement

Share Market : सगळं चांगलं चाललं होतं, त्या एका निर्णयामुळे शेअर मार्केटमध्ये पडझड

कर्ज योजनेचे निकष काय?

या योजनेंतर्गत कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे

  1. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी बँकेत पैसे जमा केलेले असणे आवश्यक आहे.
  2. कर्ज घेणाऱ्या महिलेसोबत दोन लाभार्थी जामीनदार असणे आवश्यक आहे.
  3. advertisement

  4. मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही.
  5. व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फतच करणे आवश्यक आहे.
  6. लाभार्थी कर्जदार आणि जामीनदार हे बँकेचे 'ब' वर्ग सदस्य असणे आवश्यक आहे.

कर्ज योजनेचे विवरण

कर्ज मर्यादा: 30 हजार रुपये

परतफेडीची मुदत: तीन वर्षे

व्याजदर: 10 टक्के

मासिक हप्ता: 968 रुपये

बचत गटातील महिलांसाठी विशेष सुविधा

advertisement

याशिवाय, बचत गटातील (Self-Help Groups - SHGs) महिलांसाठीही एक विशेष कर्ज योजना उपलब्ध आहे. 'जीएलजी' (जीवनदायिनी लहान गट) समूहातील महिला सदस्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. ही रक्कम विशेषतः उद्योग-व्यवसाय क्षेत्रांत वापरण्यासाठी उपयुक्त ठरेल.

या उद्योगांसाठी घेता येईल कर्ज

ब्यूटी पार्लर, शिलाई मशीन, शेवया मशीन, छोटी गिरणी घेण्यासाठी महिलांना कर्ज मिळेल. या सुविधा महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करतील, तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीस हातभार लागेल.

advertisement

या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

इच्छुक महिलांनी जवळच्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असल्याचे प्रमाणपत्र आणि आवश्यक असल्यास अन्य आधारभूत दस्तऐवज सादर करावे. तसेच अर्ज करणाऱ्या महिलेसोबत दोन लाभार्थी जमीनदार असणे आवश्यक आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

राज्य शासनाच्या 'लाडकी बहीण योजने'द्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत केवळ कर्जच नव्हे, तर महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठी पायरी चढण्याची संधी मिळेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, या बँकेने जाहीर केली नवी योजना, कसा मिळेल लाभ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल