TRENDING:

राज्यातील तृतीय पंथियांचा पहिलाच Fashion Show, कोल्हापुरात दिसला अनोखा माहोल, Video

Last Updated:

राज्यातील पहिलाच तृतीयपंथीयांचा फॅशन शो कोल्हापुरात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. यात महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : इतरांपेक्षा नेहमीच कमी प्रसिद्धी आणि कमी मानसन्मान मिळालेला समाजातला एक घटक म्हणजे तृतीयपंथी होय. कोणत्याही स्पर्धेत, कार्यक्रमात तृतीयपंथीयांना सहसा समान वागणूक मिळत नाही. मात्र कोल्हापुरातल्या काही तृतीयपंथियांनी समाजातील इतर घटकांप्रमाणेच एक मोठा फॅशन शो आयोजित करून समाजात बरोबरीने जगत असल्याचे दाखवून दिले. राज्यातील पहिलाच तृतीयपंथीयांचा फॅशन शो कोल्हापुरात मोठ्या उत्साहात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोच्या माध्यमातून अनेक तृतीयपंथियांनी सहभाग नोंदवत इतिहास घडवला आहे.

advertisement

दिनकरराव शिंदे समाजकार्य विभाग आणि मैत्री फाउंडेशन यांच्यावतीने कोल्हापुरात तृतीयपंथीय समुदायाचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. नागाळा पार्क परिसरातील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह गोवा आणि कर्नाटकातील स्पर्धकांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये रिया मयुरी आळवेकर हिने विजेतेपद पटकावले. यामध्ये सिंधुदुर्गची रिया मयुरी आळवेकर प्रथम, मिरजेच्या दीपा नाईक द्वितीय आणि पुण्याच्या दक्षता पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

advertisement

दीड किलो वजनाचा वनराज आंबा ठरतोय आकर्षण, कोल्हापुरातील महोत्सवात तब्बल 47 प्रकारचे आंबे Video

कशी पार पडली स्पर्धा ?

या फॅशन शोमध्ये हिना सय्यद, अंकिता आळवेकर, मयुर सोळंकी, रिया आळवेकर, स्मिता वदन, दीपा नाईक, मयुरी आळवेकर, करीना काळी या स्पर्धकांनी रॅम्प वॉक केला. ट्रॅडिशनल राऊंड, फ्री लान्स राऊंड आणि टॅलेंट राऊंड अशा एकूण तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. तर कोल्हापूरच्या सायबर महिला महाविद्यालयाच्या फॅशन विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योती हिरेमठ, प्रा. प्रज्ञा कापडी आणि मिस इंडिया डॉ. वैदेही पोटे यांनी या स्पर्धेसाठी परीक्षण केले.

advertisement

ॲडव्हेंचर बाईकसाठी आता बाहेर जायची गरज नाही, कोल्हापुरात मिळतेय ही सुविधा, तरुणाने बनवला भन्नाट STUDIO

योगिता मानेने स्पर्धेत आणली रंगत

या फॅशन शोच्या सुरुवातीला नृत्यांगना योगिता माने हिने दिल खेचक अदाकारी करत लावणी सादर केली. त्यामुळे सुरुवातीलाच कार्यक्रमाला रंगत चढली होती. योगिता हिने लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासोबत 3000 लावणी कार्यक्रम केले आहेत. त्यामुळे तिने सादर केलेल्या लावणीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

advertisement

दरम्यान, या अनोख्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले तृतीयपंथी, मैत्री फौंडेशनच्या मयूरी आळवेकर, संग्राम संस्थेच्या माया गुरव, रोटरी क्लबचे सदस्य, समाजकल्याण तालुका समन्वयक सुरेखा डवर, कोल्हापूर जिल्हा देवदासी समाज संघटनेचे दत्ता पवार आदी उपस्थित होते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
राज्यातील तृतीय पंथियांचा पहिलाच Fashion Show, कोल्हापुरात दिसला अनोखा माहोल, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल