TRENDING:

Kolhapur Leopard: कोल्हापुरात हॉटेलमध्ये घुसला बिबट्या, हल्ल्यात दोघे जखमी, या भागात दहशत

Last Updated:

Kolhapur Leopard: कोल्हापूर शहरात घुसून बिबट्याने वनरक्षकासह दोघांवर हल्ला केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर: गेल्या काही काळात राज्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. अशातच कोल्हापुरातून मोठी बातमी आहे. आज, मंगळवारी कोल्हापुरातील उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या हॉटेल वूडलँड परिसरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली. मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या एका बंगल्यातून बिबिट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली. यावेळी गार्डनमध्ये काम करमाऱ्या माळी आणि दुसऱ्या एका कामगारावर बिबट्याने हल्ला केला. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Kolhapur Leopard: कोल्हापुरात हॉटेलमध्ये घुसला बिबट्या, हल्ल्यात दोघे जखमी, या भागात दहशत
Kolhapur Leopard: कोल्हापुरात हॉटेलमध्ये घुसला बिबट्या, हल्ल्यात दोघे जखमी, या भागात दहशत
advertisement

मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या एका बंगल्यातून बिबट्या हॉटेल वूडलँडमध्ये आला. याठिकाणी माळी आणि निखिल कांबळे या कामगारावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये दोघेजण जखमी झाले. त्यानतंर बिबट्याने वूडलँड हॉटेलमधून बीएसएनएल कार्यालयात उडी घेतली. त्याठिकाणी एका चेंबरमध्ये बिबट्या लपून बसला. त्याला पकडताना वनरक्षक ओंकार काटकर याच्यावर देखील बिबट्याने हल्ला केला.

Sangli News: Thar, फॉर्च्युनर जिंकणाऱ्या बैलगाडा शर्यतीत घडली वाईट घटना, 12 तासांनंतर माहिती समोर

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोशल मीडियावरून सुचली कल्पना, बनवला भन्नाट मोबाईल बेल्ट, 7 लाख रुपयांची कमाई
सर्व पहा

दरम्यान, हा बिबट्या नेमका कुठून आला याबाबत संभ्रम असून याचा तपास सुरू आहे. कोल्हापूर शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून यापूर्वीच्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 1 जानेवारी 2015 मध्ये देखील रुईकर कॉलनी परिसरात बिबट्या आला होता. याठिकाणी बिबट्याला पकडताना त्याचा मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur Leopard: कोल्हापुरात हॉटेलमध्ये घुसला बिबट्या, हल्ल्यात दोघे जखमी, या भागात दहशत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल