श्री रेणुका यल्लमा मंदिरात भाविकांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात. इथं भाविक स्वेच्छेने दानही देतात. 9 मार्च ते 12 मार्च दरम्यान दानपेट्यांतील देणगीची मोजणी करण्यात आली. यामध्ये मंदिरातील कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांनी नोटा मोजल्या. या नोटा मोजतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तब्बल 3.07 कोटी रुपयांची देणगी असून लोक नोटा मोजूनच थकले आहेत.
advertisement
मोजणीत काय सापडले?
या देणगी संग्रहात 2.78 कोटी रोख रक्कम, 16.16 लाख किमतीचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 12.35 लाखांचे 4 किलो 547 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. सौंदत्ती येथील मंदिरात गेल्या आठवड्यात या देणग्या मोजण्यात आल्या. मंदिर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी 9 मार्च ते 12 मार्चदरम्यान संयुक्तपणे ही मोजणी केली.
दागिने अन् नोटा...
दरम्यान, सौंदत्तीच्या श्री रेणुका यल्लामा मंदिरातील नोटा मोजतानाचे व्हीडिओ समोर आले आहेत. यामध्ये डझनभर लोक नोटा मोजताना दिसत आहेत. यात नाणी आणि दागिने स्वतंत्रपणे मोजले जात आहेत. व्हीडिओत नोटांचा ढीग दिसत आहे. एक कर्मचारी ट्रेमध्ये नोटा वाटताना दिसतोय. तर व्हीडिओ एका टेबलावर ठेवलेल्या नोटा देखील दिसत आहेत.
