धुळ्याच्या नकाने गावातील भिकुबाई प्रकाश खैरनार या महिलेने लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता. हा त्यांचा अर्ज देखील मंजूर झाला होता. मात्र त्यांच्या खात्यात पैसेच जमा होत नव्हते. त्यानंतर भिकुबाई यांनी त्यांच्या मुलाला त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले आहेत का? याची तपासणी करण्यात सांगितले. त्यावेळेस भिकुबाई यांच्या मुलाच्या अकाऊंटवर योजनेचे पैसे जमा झाले होते. त्यामुळे हा प्रकार लक्षात आल्यानंतर भिकूबाई यांनी हे पैसे सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आणि धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या संबंधित अर्ज केला. त्यानंतर भिकुबाई यांच्या अर्जाची तपासणी केल्यानंतर त्यांना आलेले पैसे जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले होते.
advertisement
भिकुबाई यांनी नव्याने केला अर्ज
खरं तर भिकुबाई यांनी या प्रकऱणात जॉईंट अकाऊंटचा वापर केला होता.तसेच त्यांनी अर्ज भरताना देखील मुलाचे आधारकार्ड दिले होते. त्यामुळे हे सगळे पैसे त्यांच्या मुलाच्या खात्यात जमा झाले होते. त्यानंतर भिकूबाई यांनी तांत्रिक चूक सुधारत नव्याने अर्ज केला आहे. त्यामुळे भिकुबाई खैरनार या अपात्र ठरल्या नसून त्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा पुन्हा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे.
दरम्यान संबंधित महिलेने पैसे परत केल्यानंतर माध्यमांमध्ये महिलेचे पैसे सरकारने काढुन घेतल्याचे वृत्त झळकले होते. मात्र संबंधित पैसे हे भिकुबाई यांनीच सरकारला परत केले होते. सरकारने भिकुबाई यांच्या खात्यातील पैसे काढलेच नाहीयेत. त्यामुळे या बातमीने अनेक लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. कारण सरकार खात्यातून पैसे काढून घेणार असल्याचे वृत्त ऐकूण अनेक महिलांना झटका बसला होता.मात्र या बातमीने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.