TRENDING:

लक्ष्मी पूजनाच्या रात्री कोल्हापुरात अघोरी प्रकार, गावच्या वेशीवर जनावराचं काळीज, लिंबू अन्...

Last Updated:

इंगळी गावाच्या कमानीजवळ हा अघोरी प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत ऐन दिवाळीच्या काळात अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच जनावराचं काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि कापलेलं केळीचं झाड ठेवण्यात आलं होतं. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
News18
News18
advertisement

बुधवारी पहाटे काही ग्रामस्थांना रस्त्यावर विचित्र साहित्य पडलेलं दिसलं. जवळ जाऊन पाहिल्यावर ते जनावराचं काळीज असून त्यावर कुंकू आणि गुलाल टाकलेला असल्याचं लक्षात आलं. त्याचबरोबर लिंबू आणि केळी ठेवल्याचं दिसून आलं. हा सर्व प्रकार पाहताच नागरिकांमध्ये भीती आणि संताप दोन्हीची भावना निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच इंगळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

advertisement

सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात

या प्रकारामागे अघोरी पूजा किंवा काही टोळक्याचा गैरप्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्राथमिक तपासात पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असा अघोरी प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

advertisement

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

पोलीस तपास सुरू असून अघोरी पूजेचा उद्देश काय आणि कोणत्या हेतूनं हा प्रकार घडवून आणला गेला, याचा शोध सुरू आहे. इंगळी परिसरात सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लक्ष्मी पूजनाच्या रात्री कोल्हापुरात अघोरी प्रकार, गावच्या वेशीवर जनावराचं काळीज, लिंबू अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल