TRENDING:

जिद्दीनं निवडणूक जिंकली, पण नियतीनं घात केला, अजित पवार गटाच्या नगरसेविकाचा करुण अंत

Last Updated:

Latur Ajit Pawar NCP News: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. इथं एका नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Latur Ajit Pawar NCP News: लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झालेल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका शाहूताई कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. पहाटे अचानक त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. पण वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
News18
News18
advertisement

उपचारासाठी तासभर वणवण

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे शाहूताई कांबळे यांना अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांच्या नातेवाईकांनी विलंब न करता त्यांना अहमदपूर शहरातील खाजगी रुग्णालयांत धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्याने शहरातील अनेक खाजगी रुग्णालये बंद होती, तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. तब्बल एक तास उपचारासाठी वणवण फिरल्यानंतर अखेर त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

advertisement

दुर्दैवाने, शासकीय रुग्णालयात पोहोचण्यास खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. १५ ते २० मिनिटं आधी उपचार मिळाले असते, तर कदाचित शाहूताई आज आपल्यात असत्या, अशी भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातून थेट नगरपालिकेपर्यंतचा प्रवास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
सर्व पहा

शाहूताई कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव झाला होता, मात्र त्यांनी जनसंपर्क सोडला नाही. यंदा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या विजयासाठी स्वतः मैदानात उतरले होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिद्दीनं निवडणूक जिंकली, पण नियतीनं घात केला, अजित पवार गटाच्या नगरसेविकाचा करुण अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल