उपचारासाठी तासभर वणवण
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे शाहूताई कांबळे यांना अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांच्या नातेवाईकांनी विलंब न करता त्यांना अहमदपूर शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल केलं. मात्र, पहाटेची वेळ असल्याने शहरातील अनेक खासगी रुग्णालये बंद होती, तर काही ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नव्हते. तब्बल एक तास उपचारासाठी वणवण फिरल्यानंतर अखेर त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
advertisement
...तर जीव वाचला असता
दुर्दैवाने, शासकीय रुग्णालयात पोहोचण्यास खूप उशीर झाला होता. इथंही त्यांना तातडीचे उपचार मिळू शकले नाहीत. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. १५ ते २० मिनिटं आधी उपचार मिळाले असते, तर कदाचित शाहूताई आज आपल्यात असत्या, अशी भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. २५ दिवसांपूर्वी जिद्दीनं निवडणूक जिंकणाऱ्या शाहूताई यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पराभवाने खचल्या नाहीत, जिद्दीनं निवडणूक जिंकली
शाहूताई कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव झाला होता, मात्र त्यांनी जनसंपर्क सोडला नाही. यंदा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्या विजयासाठी स्वतः मैदानात उतरले होते.
