TRENDING:

माजी आमदार फोडला, लातूरचे बडे नेते शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग

Last Updated:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय नेते मंडळींच्या कोलांटउड्या सुरू झाल्या आहेत. आगामी काळातील संधी लक्षात घेता राजकीय नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत आहेत. लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात शेकडो सहकाऱ्यांसह प्रवेश केला. तसेच लातूर शहराचे माजी महापौर सुरेश पवार यांनीही धनुष्यबाण हाती घेतले. दोन्ही प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
सुधाकर भालेराव-एकनाथ शिंदे
सुधाकर भालेराव-एकनाथ शिंदे
advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे प्रवेश संपन्न झाले. बीड, पुणे, बारामती अशा विविध भागांतील राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केले.

लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला. सुधाकर भालेराव २००९ आणि २०१४ साली उदगीर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार होते. राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांनी २०१९ ला भालेराव यांचा पराभव केला. २०२४ साली भाजपने सुधाकर भालेराव यांना तिकीट नाकारल्याने विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला होता. मात्र त्या निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारले. जनतेने पुन्हा बनसोडे यांनाच विजयी केले. त्यानंतर आता ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

लातूर शहराचे माजी महापौर सुरेश पवार जे ६ वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनीही भालेराव यांच्यासोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबईत वरळी विधानसभा मतदार संघातील समाजसेवक प्रल्हाद वरळीकर यांचा ही शिवसेनेत पक्ष प्रवेश होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माजी आमदार फोडला, लातूरचे बडे नेते शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल