याबाबत मिळालेली माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातली असलेली १७ वर्षांची मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात खोली नंबर २०५ मध्ये ती राहत होती. गुरुवारी सायंकाळी तिचा मृतदेह खोलीतल्या फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
वसतिगृहात मुलीच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली. इतर विद्यार्थीनींमध्ये तणावाचं वातावरण आहे. वसतीगृहाच्या कर्मचारी सारिका जाधव यांनी कॉलेज तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद केलीय.
advertisement
आत्महत्या केलेली मुलगी अभ्यासात हुशार होती. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत तिने १०० टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर तिने लातूरमध्ये राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून अशाही परिस्थितीत तिने उज्ज्वल असं यश मिळवलं होतं. पण तिच्या आत्महत्येमुळे कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
