आरोपीचं पीडित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पण मागच्या काही दिवसांपासून महिला भेटत नाही, फोन उचलत नाही, या रागातून आरोपीनं हा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे आरोपी देखील विवाहित असून त्यालाही दोन मुलं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याशी वाद झाला होता. या वादानंतर ती आपल्या दोन मुलांना घेऊन लातूरमध्ये माहेरी राहत होती. इथेच शहरात राहणाऱ्या तानाजी जमादार नावाच्या तरुणासोबत तिचे अनैतिक संबंध सुरू होते. पण गेल्या काही काळापासून पीडित महिलेनं आरोपीसोबतचे संबंध तोडले होते, तिने आरोपीचे फोन उचललणं बंद केलं होतं.
advertisement
याच रागातून आरोपीनं बुधवारी पहाटे ४ वाजता पीडितेच्या घरात घुसला, आरोपीनं तीक्ष्ण हत्याराने पीडितेच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी तानाजी जमादार विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
