लातूर तालुक्यातलं हे आहे बोरगाव काळे गाव , या गावात एका महिलेनं सरपंच पदाची धुरा हाती घेतली आणि या गावाचं नशीबच बदललं . या गावच्या महिला सरपंच अनिता काळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर करून घेण्याची किमया साधलीय.
कुत्रा चावल्याचं लपवलं, दीड महिन्यांनी लागला तडफडायला; वडिलांच्या मांडीवर सोडला जीव
advertisement
वृद्ध मातापित्यांच्या भविष्याचा विचार करत गावातील कोणत्याही वृद्धाला वृद्धाश्रमात पाठवण्याची वेळ येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनेच पावले उचलली. वृद्ध आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्याना ग्रामपंचायतीतून कोणतीही सुविधा अथवा कोणतेही प्रमाणपत्र न देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय वृक्ष लागवड चळवळ उभी करून वृक्षाचं रोपण व्हावं यासाठी नवीन लग्न झालेल्या दांपत्याला वृक्ष लागवड केल्याशिवाय विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार नसल्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय.
ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत सर्व ग्रामस्थांनी केलंय , या निर्णयामुळं कोणताही वृद्ध निराधार राहणार नसल्यानं ग्रामस्थांना देखील या निर्णयाचं कौतुक वाटतंय असल्याचं सरपंच अनिता काळे यांनी म्हटलं. वृद्धांच्या भविष्याचं नियोजन आणि वृक्ष लागवड चळवळ उभं करणारी कदाचित मराठवाड्यातली हि पहिलीच ग्रामपंचायत असावी.
