Delhi : कुत्रा चावल्याचं लपवलं, दीड महिन्यांनी लागला तडफडायला; वडिलांच्या मांडीवर सोडला जीव

Last Updated:

दीड महिन्यापूर्वी मुलाला कुत्रा चावला होता. त्याने घरी याबाबत सांगितलं नाही. 1 सप्टेंबरला त्याला पाण्याची भीती वाटू लागली. चित्र विचित्र वागायला लागला.

News18
News18
दिल्ली, 06 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका १४ वर्षीय मुलाला शेजारी राहणाऱ्यांचा पाळीव कुत्रा चावला होता. तेव्हा घाबरून मुलाने ही गोष्ट घरी सांगितली नाही. मात्र त्याला रेबीजची लागण झाली आणि त्यानंतर मुलाचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलाच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला काही महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता. मात्र भीतीने त्याने ही गोष्ट घरी सांगितली नाही. हळू हळू मुलाची तब्येत बिघडायला लागली. त्याच्यासोबतच्या मित्रांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी कुत्र्याने चावा घेतला होता अशी माहिती दिली. यानंतर मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारावेळीच त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या जीबीटी आणि एम्समध्येही मुलाला दाखल केले. पण डॉक्टरांनी या आजारावर उपचार नसल्याचं सांगितलं. मंगळवारी सायंकाळी एम्बुलन्समध्येच मुलाचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
१४ वर्षांचा शाहवेज आठवीमध्ये शिकत होता. वडिलांनी सांगितलं की, त्याला दीड महिन्यापूर्वी कुत्रा चावला होता. त्याने घरी याबाबत सांगितलं नाही. १ सप्टेंबरला त्याला पाण्याची भीती वाटू लागली. चित्र विचित्र वागायला लागला. कधी कधी कुत्र्यासारखा भूंकायला लागला. स्थानिक डॉक्टरांनाही दाखवलं तेव्हा रेबिजची लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी मोट्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला पण तिथे यावर उपचार नसल्याचं सांगण्यात आलं.
advertisement
गाझियाबाद पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, १४ वर्षांच्या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकऱणी कुटुंबियांच्या तक्रारीवरून शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई केली जात आहे. कुत्र्याची मालकीन असलेल्या महिलेला नोटीस पाठवण्यात आली आहे. कुत्र्याला लस द्यावी अन्यथा महिलेवर कारवाई केली जाईल. तसंच ५ हजार रुपयांचा दंडही करण्यात येईल.
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi : कुत्रा चावल्याचं लपवलं, दीड महिन्यांनी लागला तडफडायला; वडिलांच्या मांडीवर सोडला जीव
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement