BMC Election Vote Counting: मुंबईत 'या' २३ ठिकाणी मतमोजणी कक्ष, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात

Last Updated:

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई मतमोजणी केंद्र
मुंबई मतमोजणी केंद्र
मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५– २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.
बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभागाकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे.
advertisement
महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे, उपजिल्‍हाधिकारी महादेव किरवले यांच्‍यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
advertisement
महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले.
advertisement
मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्‍यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
advertisement
कुठे कुठे मतमोजणी केंद्र?
-धारावी : भारतरत्न राजीव गांधी जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, धारावी बस डेपो रोड, धारावी
-सायन कोळीवाडा : न्यू सायन म्युनिसिपल स्कूल, सायन (पूर्व) लायन्स तारा चंदबाप्पा हॉस्पिटलजवळ
-वडाळा : महानगरपालिका न्यू बिल्डिंग, भगवान वाल्मीकी चौक, हनुमान मंदिराजवळ, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल
-माहीम : इमराल्ड हॉल, डॉ. अँथोनिया डी. सिल्वा माध्यमिक शाळा, राव बहादूर एस. के. बोले रोड, दादर
advertisement
-वरळी : महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंड हॉल, वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, फिनिक्स मॉलसमोर, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी
-शिवडी : एन. एम. जोशी रोड म्युनिसिपल प्रायमरी मराठी शाळा, एन. एम. जोशी मार्ग, करीरोड
-भायखळा : रिचर्डसन क्रुडास कंपनी लिमिटेड, सर जे. जे. रोडजवळ, भायखळा
-मलबार हिल : विल्सन कॉलेज हॉल, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, चर्नीरोड
advertisement
-मुंबादेवी : गिल्डरलेन महानगरपालिका शाळा, गिल्डर लेन, मुंबई सेंट्रल स्टेशन
-कुलाबा : सर जे. जे. आर्ट स्कूल कॅम्पस, सीएसएमटी स्टेशन, फोर्ट
-बोरीवली : १३/सी एफसीआय गोडाऊन, बोरिवली
-दहिसर : रुस्तुमजी बिझनेस कॉम्पलेक्स महानगरपालिका मंडई. बिल्डिंग, दहिसर
-मागाठाणे : कँटिन हॉल, सीटीआयआरसी अभिनवनगर, राष्ट्रीय उद्यानाजवळ, बोरीवली
-कांदिवली पूर्व : पालिका सोशल वेल्फेअर सेंटर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली
-चारकोप : बजाज म्युनिसिपल स्कूल, बजाज रोड, कांदिवली
-मालाड पश्चिम : टाऊनशिप म्युनिसिपल हिंदी सीबीएससी इंग्लिश मालवणी मार्वे रोड
-जोगेश्वरी पूर्व : बॅटमिंटन हॉल, न्यू जिमखाना बिल्डिंग, इस्माईल युसुफ कॉलेज कम्पाउंड, जोगेश्वरी
-दिंडोशी : मुंबई पब्लिक स्कूल, कुरार व्हिलेज, मालाड
-गोरेगाव : उन्नतनगर मुंबई पब्लिक स्कूल उन्नतनगर २, गोरेगाव
-वर्सोवा : शहाजीराजे भोसले स्पोर्टस कॉम्पलेक्स, आझादनगर, अंधेरी पश्चिम
-अंधेरी पश्चिम : एसएनडीटी महिला विद्यापीठ जुहू रोड, सांताक्रूझ पश्चिम
-अंधेरी पूर्व : गावदेवी महापालिका शाळा, मथुरादास रोड, अंधेरी पूर्व
-मुलुंड : मुंबई पब्लिक स्कूल, मिठागररोड, मुलुंड पूर्व
-विक्रोळी : एम. के. ट्रस्ट सेकंडरी स्कूल मुख्य इमारत, कन्नमवारनगर, विक्रोळी (पूर्व
-भांडूप : सेंट झेवियर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एल.बी.एस.रोड, कांजूरमार्ग पश्चिम
-घाटकोपर पश्चिम : मुंबई पब्लिक स्कूल, वर्षानगर, वीर सावरकर मार्ग, कैलाश कॉम्प्लेक्स पार्क साईट, विक्रोळी पश्चिम
-घाटकोपर पूर्व : मुंबई पब्लिक स्कूल, पंतनगर नं. ३ कॉम्प्लेक्स, घाटकोपर पूर्व
-मानखुर्द : शिवाजीनगर - म्युनिसिपल मॅटर्निटी हॉस्पिटल, लल्लुभाई कम्पाउंड, मानखुर्द.
-विलेपार्ले : मुंबई पब्लिक स्कूल, विलेपार्ले पूर्व, म्युनिसिपल मराठी प्राथमिक शाळा, कमलानगर, विलेपार्ले पश्चिम
-चांदिवली : आयटीआय, किरोळरोड, विद्याविहार पश्चिम
-कुर्ला : शिवसृष्टी कामराजनगर महापालिका शाळा, कुर्ला पूर्व
-कलिना : मल्टी पर्पज हॉल, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ पूर्व
-वांद्रे पूर्व : ग्रीन टेक्नॉलॉजी बिल्डींग, मुंबई विद्यापीठ, कलिना
-वांद्रे पश्चिम : आर. व्ही. टेक्निकल हायस्कूल, खार
-अणुशक्तीनगर : लोरेटो कॉव्हेंट स्कूल, आरसीएफ कॅम्पस, चेंबूर
-चेंबूर : आरसीएफ स्पोर्ट्स क्लब, बॅडमिंटन हॉल, आरसीएफ कॉलनी, आर.सी. मार्ग, चेंबूर
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Vote Counting: मुंबईत 'या' २३ ठिकाणी मतमोजणी कक्ष, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement