2026 मध्ये फोल्डेबल फोन घ्यायला पाहिजे की नाही? विकत घेण्याचं मनात जरी आलं तरी आधी याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
याच समस्येवर तोडगा म्हणून आलेले 'फोल्डेबल' (Foldable) स्मार्टफोन आता 2026 मध्ये केवळ एक फॅशन उरलेले नाहीत, तर ते अनेकांच्या आयुष्याचा भाग बनू लागले आहेत. पण, लाखो रुपये खर्च करून असा फोन घेण्याची हीच योग्य वेळ आहे का? की अजून थोडी वाट पाहावी? जाणून घेऊया सविस्तर.
मुंबई : आपल्याला आठवतंय? काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण घराबाहेर पडायचो, तेव्हा खिशात फक्त एक छोटं पाकीट आणि साध्या स्क्रीनचा मोबाईल असायचा. पण आज काळ बदलला आहे. आता आपला मोबाईल फक्त फोन राहिलेला नाही, तर तोच आपला सिनेमा हॉल आहे, तेच ऑफिस आहे आणि तोच आपला गेमिंग झोनही आहे. अशातच एक मोठी समस्या जाणवते. स्क्रीन मोठी हवी असेल तर फोन खिशात मावत नाही आणि फोन छोटा हवा असेल तर काम नीट होत नाही.
याच समस्येवर तोडगा म्हणून आलेले 'फोल्डेबल' (Foldable) स्मार्टफोन आता 2026 मध्ये केवळ एक फॅशन उरलेले नाहीत, तर ते अनेकांच्या आयुष्याचा भाग बनू लागले आहेत. पण, लाखो रुपये खर्च करून असा फोन घेण्याची हीच योग्य वेळ आहे का? की अजून थोडी वाट पाहावी? जाणून घेऊया सविस्तर.
'प्रायोगिक' ते 'प्रॅक्टिकल' : बदललेला प्रवास
एकेकाळी फोल्डेबल फोन म्हणजे केवळ टेक इव्हेंट्समध्ये दाखवण्याची वस्तू मानली जायची. मात्र, 2025 मध्ये आलेल्या Samsung Galaxy Fold 7 ने या सेगमेंटमध्ये क्रांती घडवून आणली. आजचे फोल्डेबल फोन हे एखाद्या सामान्य फ्लॅगशिप फोन इतकेच (उदा. Galaxy S25 Ultra) पातळ आणि हलके झाले आहेत. त्यामुळे 'जास्त वजन' ही तक्रार आता इतिहास जमा झाली आहे.
advertisement
मजबुती आणि डिस्प्लेमध्ये झालेली सुधारणा
सुरुवातीच्या काळात फोल्डेबल फोनच्या स्क्रीनवर पडणारी 'क्रीज' (मध्यभागी येणारी रेषा) युजर्सना खटकायची. पण आताच्या नवीन मॉडेल्समध्ये ही क्रीज जवळपास अदृश्य झाली आहे. कंपन्यांनी फोनच्या 'हिंज' (Hinge) म्हणजेच सांध्यावर विशेष काम केले आहे, ज्यामुळे फोन उघडणे आणि बंद करणे अत्यंत स्मूथ वाटते. इतकंच नाही, तर आता हे फोन वॉटर आणि डस्ट रेझिस्टंट (IP रेटिंगसह) असल्याने ते आधीपेक्षा कितीतरी पतीने सुरक्षित झाले आहेत.
advertisement
फोल्डेबल फोन घेण्याचे मोठे फायदे:
मल्टिटास्किंगचा राजा: एकाच वेळी एका स्क्रीनवर मीटिंग करणे आणि दुसऱ्या स्क्रीनवर नोट्स काढणे आता सोपे झाले आहे. 'स्प्लिट स्क्रीन' फिचरमुळे काम करण्याचा वेग वाढतो.
व्हिडिओ पाहताना किंवा गेम खेळताना तुम्हाला एका छोट्या टॅबलेटचा अनुभव मिळतो.
गर्दीमध्ये तुमची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी हे फोन पुरेसे आहेत.
advertisement
पण... उत्साहाच्या भरात 'हे' मुद्दे विसरून चालणार नाही
एकीकडे फायदे असले तरी काही आव्हाने अजूनही कायम आहेत
खिशाला कात्री: फोल्डेबल फोनची किंमत आजही सामान्य प्रीमियम फोनच्या तुलनेत खूप जास्त आहे.
जर चुकून फोनच्या फोल्ड होणाऱ्या स्क्रीनला इजा झाली, तर ती दुरुस्त करण्याचा खर्च तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त असू शकतो.
अजूनही सर्वच ॲप्स फोल्डेबल स्क्रीनच्या आकाराशी पूर्णपणे जुळवून घेत नाहीत, ज्यामुळे कधीकधी अनुभव अपूर्ण वाटू शकतो.
advertisement
अंतिम निर्णय: तुम्ही हा फोन घ्यावा का?
तुम्ही हा फोन नक्की घ्यावा जर... तुम्ही एक कंटेंट क्रिएटर, बिझनेस प्रोफेशनल किंवा मल्टिटास्किंगचे शौकीन असाल. तुम्हाला नवीन तंत्रज्ञान वापरायला आवडत असेल आणि तुमचे बजेट जास्त असेल, तर 2026 मधील फोल्डेबल फोन तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक ठरू शकतात.
तुम्ही हा फोन टाळावा जर... तुमचा फोन वापरण्याचा स्वभाव थोडा रफ (Rough Use) असेल किंवा तुम्हाला कमी मेंटेनन्स असलेला आणि खिशाला परवडणारा फोन हवा असेल. अशा वेळी पारंपारिक फ्लॅगशिप फोनच तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरतील. थोडक्यात सांगायचे तर, फोल्डेबल फोन आता फक्त 'वापरण्याची वस्तू' राहिले नसून ते भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा ठरवत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 10:16 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
2026 मध्ये फोल्डेबल फोन घ्यायला पाहिजे की नाही? विकत घेण्याचं मनात जरी आलं तरी आधी याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या










