Akola News : माता न तू वैरिणी! चिमुकलीच्या नाकाला लावला चिमटा, आईनेच केली मुलीची हत्या

Last Updated:

मुलीची हत्या केल्यानंतर आईने तिच्या मृत्यूचा बनाव रचला होता. पण शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू नव्हे तर हत्या झाली असल्याचा उलगडा झाला.

News18
News18
कुंदन जाधव, अकोला, 06 सप्टेंबर : अकोल्यात एका पाच वर्षीय मुलीला आईनेच मारल्याची धक्कादायक घटना घडलीय. मुलीची हत्या केल्यानंतर आईने तिच्या मृत्यूचा बनाव रचला होता. पण शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू नव्हे तर हत्या झाली असल्याचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे. अकोल्यातील बलोदे लेआउट इथं ही घडना घडली. किशोरी रवी आमले असं दुर्दैवी मुलीचं नाव असून विजया आमले असं तिच्या आईचं नाव आहे.
अकोला शहरातील बलोदे ले-आउटमध्ये राहणाऱ्या रवी आमले यांनी मुलीच्या मृत्यूनतंर पोलिसात पत्नीविरोधात तक्रार दिली. रवी आमले यांना पाच वर्षांची किशोरी नावाची मुलगी होती. त्यांची पत्नी नेहमीच त्यांच्या आईसोबत वाद घालायची. कुटुंबापासून वेगळं राहण्यासाठी तगादा लावायची. त्यामुळे ते कुटुंब हिंगणा येथे भाड्याची खोली करून राहू लागले. 2 जूनला दुपारी आमले घरी जेवायला घरी आले. किशोरी ट्युशनवरून घरी आली. नंतर रवी आमले आणि किशोरी सोबत खेळले जेवण केलं. नंतर रवी आमले कामावर निघून गेले.
advertisement
दरम्यान, दुपारच्या वेळेला पत्नीचा फोन आला. किशोरी पलंगावर खेळता खेळता झोपली ती उठत नाही. तिला दवाखान्यात नेले, तिथे डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. त्यानंतर रवी आमले यांनी तक्रारीत पत्नी लग्नापासून वाद घालायची, घटस्फोटाची मागणी करायची, त्यामुळे पत्नीनेच मुलगी किशोरीच्या नाकाला प्लास्टिक चिमटा लावला आणि त्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला होता. या प्रकरणी खदान पोलिसांनी 302 चा गुन्हा दाखल करून, मुलीचा जीव घेणाऱ्या क्रूर आईला ताब्यात घेतले. आईने मुलीला का मारले याचे कारण अजून समजले नाही. पोलीस तपासात हे निष्पन्न होईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अकोला/
Akola News : माता न तू वैरिणी! चिमुकलीच्या नाकाला लावला चिमटा, आईनेच केली मुलीची हत्या
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement