Yawatmal : लेकराला कुलरचा शॉक बसला, आई वाचवायला गेली; दोघांचाही मृत्यू

Last Updated:

कुलरचा शॉक लागून मायलेकराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील दाभडी इथं घडली.

News18
News18
यवतमाळ, 06 सप्टेंबर : कुलरचा शॉक लागून मायलेकराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळमधील दाभडी इथं घडली. मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यात वनिता सुनील राठोड आणि त्यांचा ९ वर्षांचा मुलगा कुणालचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनिता राठोड या सायंकाळी शेतातून घरी आल्या. तेव्हा मुलगा कुणालला त्यांनी कुलर लाव असं सांगितलं. आईने सांगताच कुलर लावण्यासाठी गेलेल्या कुणालला शॉक बसला आणि त्याच्या अंगावर कुलर पडला.
मुलाला शॉक बसून कुलर अंगावर पडल्याचं लक्षात येताच वनिता या कुलर उचलण्यासाठी धावल्या. तेव्हा त्यांनाही कुलरचा शॉक बसला. मातीचे घर असल्यानं कुलरच्या पाण्याने जमिन ओलसर झाली होती. त्यामुळेच कुलर सुरू करत असताना शॉक बसून दुर्दैवाने माय लेकरांचा मृ्त्यू झाला.
advertisement
अर्नाळ्यात 17 वर्षीय मुलीला सर्पदंश, कुटुंबियांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
अर्नाळ्यात विषारी साप चावल्याने एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे. संजना अशोक चव्हाण (वय 17) वर्ष असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ही घरात झोपली असता विषारी सापाने तिच्या दोन्ही हाताला दंश केला. दरम्यान, रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा जीव गेला असल्याचा आरोप मृत संजनाच्या कुटुंबियांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Yawatmal : लेकराला कुलरचा शॉक बसला, आई वाचवायला गेली; दोघांचाही मृत्यू
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement