लातूरमध्ये कोयता गँगचा धुडगूस
लातूर शहरात दहशत निर्माण करण्यासाठी नव्याने कोयता गँग सक्रिय झाली आहे. निलंगा येथील कोर्टाच्या आवारात कोयता घेऊन दहशत माजविन्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच लातूर शहरात देखील लातूर बार्शी रोडवर पुण्याला जाणाऱ्या खाजगी ट्रव्हल्सवर कोयता गँगने कोयत्यानं हल्ला करत खाजगी ट्रव्हल्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलय. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालं असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.
advertisement
पुण्यात काय घडलं?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी जेवण करण्यासाठी बसलेल्या युवकावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याने आळंदी येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.अविनाश बाळू धनवे (वय 34 अंदाजे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
वाचा - दुसऱ्या वर्गातील शिक्षिकाही उपस्थित, सुरू होती सामूहिक कॉपी, तरुण लिहित होता...
शनिवारी (दि.16) सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल जगदंबा या ठिकाणी मयत धनवे इतर काही सहकार्यांसोबत जेवण करण्यासाठी बसला होता. यावेळी चार चाकी मधून आलेल्या सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. यामध्ये धनवे नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
